Coronavirus : पाचही रुग्णांचे रिपाेर्ट निगेटीव्ह; चारचा अहवाल प्रतिक्षेत

Coronavirus : पाचही रुग्णांचे रिपाेर्ट निगेटीव्ह; चारचा अहवाल प्रतिक्षेत

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 15 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले. इस्लामपूरातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांचाही त्यात समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.३१ मार्च) जिल्हा रुग्णालयात चार तर, कऱ्हाडातील कृष्णा रुग्णालयात पाच संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले हाेते. त्यापैकी कृष्णामधील पाचही रुग्णांचे आज (बुधवार) रिपाेर्ट निगेटीव्ह आलेले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधीतांची संख्या जिल्ह्यामध्ये वाढत नसली तर, प्रशासनाकडून जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे परदेश प्रवासाची किंवा कोरोनाबाधीत संशयित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची हिस्ट्री असल्यास व काही लक्षण दिसल्यास संबंधीतांची तातडीने तपासणी केली जात आहे. त्यानुसार (ता. 30) दरम्यान 13 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी "कृष्णा'तील दाखल चार वर्षांच्या मुलासह चौघांचे अहवाल निगेटीव्ह आले. जिल्हा रुग्णालयामध्ये पूर्वी दाखल असलेल्या दोन व काल दाखल झालेल्या नऊ अशा 11 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यामध्ये परदेशातून आलेल्या सात, इस्लामपूरातील कोरोना संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोन व अन्य दोन व्यक्तींचा समावेश आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
 
दरम्यान, बाहेर न पडण्याच्या, दुकानांसमोर गर्दी न करण्याच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांनी आजही कारवाई सुरू ठेवली होती. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्या सुमारे 100 दुचाकी मंगळवारी जिल्हाभरात जप्त करण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही आज शहरातून दुचाकीवर फेरफटका मारून एकंदर परिस्थीतीचा आढावा घेतला. मार्केट यार्ड परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून बाजार छत्रपती शाहु क्रिडा संकुलात भरविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
त्याचबरोबर आजपासून (ता. 1) 14 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात जमाव व शस्त्रबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच शिधापत्रीकांवर धान्य वाटप सुरू होणार आहे. त्यामध्ये अत्यांदय व केशरी कार्डधारकांना आधी मिळत आलेल्या धान्याबरोबर प्रती माणसी पाच किलो गहू व पाच किलो तांदूळ मोफत मिळेल. मोफत देण्यात येणाऱ्या धान्याचे पैसे नागरिकांकडून आकारले जावू नये, अन्यथा अशा दुकानादारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. 

चमकण्यासाठी माेदी एकही संधी साेडत नाहीत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका 

शिक्षण विभागाचा अजब कारभार 

संपूर्ण जिल्हा प्रशासन नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत शिक्षण विभागाने मात्र, शाळा-शाळांमध्ये गर्दी जमविण्याचा फतवा काढला आहे. शाळांमध्ये शिल्लक राहिलेले शालेय पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून द्यावे, असे निर्देश काढले आहेत. हे करताना विद्यार्थी व पालकांमध्ये योग्य अंतर राहिल, याची दक्षता घ्यावी असे म्हटले आहे. परंतु, मुलांच्या गर्दीवर नियंत्रण राहिलच याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे या निर्णयाने सामाजिक अंतर राखण्याच्या व गर्दी टाळण्याच्या मुख्य तत्वालाच हरताळ फासला गेला आहे. 


कोरोना इफेक्‍ट... 

  •  नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत 15 एप्रिलनंतर निर्णय 
  •  दिवसभरात जिल्ह्यात 100 दुचाकी जप्त 
  •  शिधापत्रीकांवर धान्य वाटप उद्यापासून सुरू 
  •  मलकापूरात जनता कफ्यूला उस्फूर्त प्रतिसाद 
  •  बंगळूरहून मध्य प्रदेशला पायी निघालेले 135 मजूर देखरेखीखाली 
  •  परदेशवारीतील 115 जण होम क्वारंटाइन 
  •  कऱ्हाडातील रेल्वे धक्‍क्‍यावरील हमालांची उपासमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com