कोल्हापुरात नगरसेवकावर गुंडांचा हल्ला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

सागर तहसीलदार हा मोक्का अंतर्गत अटकेत असणाऱ्या स्वप्नील तहसीलदार याचा भाऊ आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोल्हापूर - येथील मुक्तसैनिक वसाहत प्रभागांमधील नगरसेवक राजसिह भगवानराव शेळके (वय ४७) यांच्यावर बुधवारी रात्री सागर तहसीलदार आणि अन्य ६ जणांनी दगडाने प्राणघातक हल्ला केला. 

या हल्ल्यात शेळके यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री शेळके हे आपल्या घराच्या गेटजवळ उभारले असताना सागर तहसीलदार आणि त्याच्या अन्य ६ साथीदारांनी शेळके याना शिवीगाळ करत दगडाने मारण्यास सुरवात केली. या मारहाणीपासून वाचण्याच्या प्रयत्न करत असलेल्या शेळके यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शेळके यांच्या मनगटावर व चेहऱ्यावर दगड लागल्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. 

सागर तहसीलदार हा मोक्का अंतर्गत अटकेत असणाऱ्या स्वप्नील तहसीलदार याचा भाऊ आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: corporater attacked in kolhapur