`ही` महापालिका पुन्हा "बाय इलेक्‍शन'च्या फेऱ्यात 

`ही` महापालिका  पुन्हा "बाय इलेक्‍शन'च्या फेऱ्यात 

सोलापूर ः महापालिकेत पुन्हा पोटनिवडणुकीची शक्‍यता आहे. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले.  हे प्रकरण न्यायप्रविष्ट न झाल्यास पोटनिवडणूक होईल. महापालिका सभेस सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. 

महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1969 मध्ये झाली. कॉंग्रेसचे नगरसेवक श्रीशैलप्पा किणगी यांचे निधन झाल्यामुळे पहिली पोटनिवडणूक झाली.
 75 ते 80 या कालावधीत कॉंग्रेसचे नगरसेवक कैरमकोंडा यांची निवड तांत्रिक कारणामुळे अवैध ठरल्याने दुसरी पोटनिवडणूक झाली. 1980 ते 85 या कालावधीत प्रशासकीय कारभार होता.  1985 ते 90 या कालावधीत मुरलीधर घाडगे आणि परमेश्‍वर कोळी यांच्या निधनाने तिसरी पोटनिवडणूक झाली. जनता दलाचे रवी पाटील आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम हे आमदार झाले. त्या वेळी झालेल्या चौथ्या पोटनिवडणुकीत इब्राहिम विजापुरे आणि माशप्पा विटे नगरसेवक झाले.

2007-2012 या कालावधीत शिवसेनेचे राजू भिंगारे, मीनाक्षी ज्याई आणि भाजपचे शंकरसिंग कय्यावाले यांचे सदस्यत्व अवैध जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाले. त्यामुळे पाचवी पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसचे नगरसेवक जब्बार शेख यांची हत्या झाल्यानंतर  झालेल्या सहाव्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तौफिक शेख निवडून आले. भाजपचे अनंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने 2013 मध्ये सातवी पोटनिवडणूक झाली. त्या ठिकाणी भाजपचे संजय कोळी निवडून आले. याच टर्ममध्ये कॉंग्रेसच्या नगरसेविका दमयंती भोसले यांचे निधन झाले. तर प्रभाग कॉंग्रेसचे 
तत्कालीन नगरसेवक महेश कोठे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आठवी पोटनिवडणूक झाली. आता होणारी पोटनिवडणूक नववी आहे. 

... म्हणून झाली नाही पोटनिवडणूक 
1997-2002 या कालावधीतील भाजपच्या सुलोचना कोळी, अंबादास दोडमनी, शंकरसिंग कय्यावाले, शिवसेनेच्या शैला चव्हाण व अपक्ष श्रीमती 
सुमन बायस यांचे नगरसेवकपद टर्मची मुदत संपण्याच्या अंतिम टप्प्यात रद्द झाले. त्यामुळे पोटनिवडणूक झाली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com