पाच नगरपालिकांत निवडी एकतर्फीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित
कोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत शनिवारी (ता. १७ ) या निवडी होत आहेत. 

उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित
कोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत शनिवारी (ता. १७ ) या निवडी होत आहेत. 

इचलकरंजी, कागलमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे, तर पेठवडगावमध्ये युवक क्रांती आघाडीच्या प्रमुख श्रीमती प्रविता सालपे, कुरुंदवाडमध्ये राष्ट्रवादीचे जवाहर पाटील यांची या पदावरील निवड निश्‍चित समजली जाते. इचलकरंजीत स्वीकृत नगरसेवकांच्या पाच 
जागा आहेत. प्रत्येक पक्षाला एक जागा मिळणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. त्यामुळे उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीने हक्क सांगितला असला तरी याच आघाडीत समाविष्ट शाहू आघाडीचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी या पदाची मागणी केली आहे.

वडगावमध्ये ‘स्वीकृत’च्या दोन्ही जागा युवक क्रांतीला मिळणार आहेत. 
मलकापूरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल केसरकर विजयी झाले. या ठिकाणी जनसुराज्यची आघाडी भाजपशी असल्याने उपनगराध्यक्षपद ‘जनसुराज्य’ला जाण्याची शक्‍यता आहे. ‘स्वीकृत’च्या दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा भाजप व जनसुराज्यला मिळणार आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला; मात्र नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार निश्‍चित आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीत राष्ट्रवादीला एक व ताराराणी आघाडीला एक जागा मिळणार आहे. या पदावर अनुक्रमे संभाजी पवार व सौ. शीतल गतारे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. गडहिंग्लजमध्ये जनता दलाची एकहाती सत्ता असल्याने नगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकही याच पक्षाचे होतील.

उपनगराध्यक्षपदासाठी नितीन देसाई व उदय पाटील यांची, तर स्वीकृत म्हणून उदय कदम यांचे नाव चर्चेत आहे. 

कागलमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे, त्यांना नऊ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे दोन नगरसेवकही त्यांच्यासोबत राहतील. यासाठी उपनगराध्यक्षपद शिवसेनेला दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

या स्पर्धेत शिवसेनेच्या जयश्री शेवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे 
नितीन दिंडे, प्रवीण काळबर यांची नावे आघाडीवर आहेत. ‘स्वीकृत’साठी भैया माने व चंद्रकांत गवळी यांची नावे पुढे आली आहेत. मुरगूडवर शिवसेनेची सत्ता असल्याने उपनगराध्यक्ष, स्वीकृत निवडीही एकतर्फीच होतील. उपनगराध्यक्षपदासाठी नामदेव मेंडके तर स्वीकृतचा निर्णय शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्यावर अवलंबून आहे. 

कुरुंदवाडमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देऊन या पदावर जवाहर पाटील यांची निवड करण्याचे निश्‍चित झाले आहे. ‘स्वीकृत’ निवडीत मात्र राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. दोनपैकी प्रत्येकी एक जागा काँग्रेस व भाजपला जाईल. भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, तर काँग्रेसकडून वैभव उगळे यांची ‘स्वीकृत’ निवड निश्‍चित आहे.

Web Title: corporation election result kolhapur district