सांगली: महापालिकेला 14 व्या वित्त आयोगाकडून 25.61 कोटी निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जानेवारीला महापालिका क्षेत्रात नागरी सुविधांसाठी नगरविकास विभागातून शंभर कोटींचे विशेष अनुदान देण्याची घोषणा केली.

सांगली - सांगलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापालिकेला 14 व्या वित्त आयोगाकडून 25.61 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 12.70 कोटी मिरज अमृत योजनेसाठी व सांगलीस 12.90 कोटींचा निधी इतर योजनांसाठी देण्यात आला.

शासनाने सत्ता बदल झाल्यानंतर दिलेले हे दुसरे बक्षीस आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने निधी मिळाला.  महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जानेवारीला महापालिका क्षेत्रात नागरी सुविधांसाठी नगरविकास विभागातून शंभर कोटींचे विशेष अनुदान देण्याची घोषणा केली. या निधीतून करावयाच्या कामांचा आराखडाही मागवला आहे. आराखड्याचे काम सुरू असतानाच शासनाने 14 व्या वित्त आयोगातून 25.61 कोटींचा निधी मंजूर केला.  महापालिका क्षेत्रात कॉंग्रेस आघाडीला नाकारून नागरिकांनी भाजपला सत्तेत आणले. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांनी अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध रहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी केले आहे. 

Web Title: Corporation receives twenty five crores fund from fourteenth Finance Commission