मनपात कर भरण्यासाठी तिसऱ्या दिवशीही गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महापालिकेचा कर भरण्यासाठी पाचशे आणि हजारांच्या नोटा चालत असल्याने तो भरण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशीही गर्दी कायम होती. रविवारी सुटी असूनही महापालिकेच्या तिजोरीत नागरिकांनी 67 लाखांचा भरणा केला. तीन दिवसांत मनपाकडे 4 कोटी 9 लाख 17 हजार 34 रुपये असा महसूल जमा झाला आहे. 

केंद्राने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर सरकारी कर भरण्यासाठी मात्र या नोटा चालतील, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे महापालिकेची थकबाकी भरण्यासाठी गर्दी झाली. वर्षानुवर्षे ज्यांनी करच भरला नाही, असे काही लोकही यामुळे पुढे आले. महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात कर भरण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: Corporation tax for the third day rush to fill