मुले चोरणाऱ्या टोळीतील एक समजून नगरसेवकास मारहाण

अभय जोशी
शुक्रवार, 29 जून 2018

पंढरपूर : पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार बाळोबा डोंबे यांच्यासह अन्य दोन जणांना ते मुले चोरणाऱ्या टोळीतील लोक आहेत अशा गैरसमजातून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्‍यातील म्हसावद येथील ग्रामस्थांनी
बेदम मारहाण मारहाण केली. गावकऱ्यांनी डोंबे यांची इनोव्हा (एम एच 13
बी एन 7971) गाडी फोडून पेटवून दिली. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या
सुमारास घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन रक्तबंबाळ झालेल्या डोंबे व
त्यांच्या साथीदारांची जमावापासून सुटका केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या घटनेची समजलेली माहिती अशी की पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे, रामा विठ्ठल शिंदे (भटुंबरे ता.पंढरपूर) आणि गुरुलिंग कवडे
(रा.पटवर्धनकुरोली, ता.पंढरपूर) हे मजूर मिळवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात
फिरत होते. मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा त्या भागात
असल्याने म्हसावद येथील गावकऱ्यांना डोंबे व त्यांच्या साथीदारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ते मुले चोरणाऱ्या टोळीतील आहेत असा गावकऱ्यांचा समज झाला. काही जणांनी डोंबे यांच्या इनोव्हा गाडीचा पाठलाग करुन गाडी थांबवली आणि अन्य गावकऱ्यांना बोलवून घेतले. डोंबे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु दोन, तीन हजार लोकांनी डोंबे यांच्या गाडीला घेरुन गाडीतील सर्वांना बाहेर काढून बेदम मारहाण केली. काही लोकांनी त्यांची इनोव्हा गाडी फोडून नंतर ती पेटवून दिली. जमावाने
केलेल्या मारहाणीत तिघेही जण रक्तबंबाळ झाले.

दरम्यान या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचले व त्यांनी डोंबे व त्यांच्या सोबतच्या दोघांना होत असलेली मारहाण थांबवली. परंतु चिडलेला जमाव शांत होत नव्हता. पोलिसांनी जखमी अवस्थेतील डोंबे व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिस ठाण्यात नेले. परंतु तिथे ही जमावाने गोंधळ सुरु केल्याने शेवटी शहादा येथून एसआरपी सह जादा पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. जमावाला शांत करण्यासाठी सौम्यलाठी मार करण्यात आला. पोलिसांनी डोंबे व त्यांच्या सहकाऱ्यांना नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सर्वांची तब्येत व्यवस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: corporator beaten by people by misunderstanding in pandharpur