इस्लामपूरमध्ये मद्यधुंद नगरसेवकाला जोरदार 'चोप'

इस्लामपूरमध्ये मद्यधुंद नगरसेवकाला जोरदार 'चोप'

इस्लामपूर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इस्लामपूर येथील एका नगरसेवकाला रुग्णालयात धिंगाणा घालताना जोरदार ‘चोप’ दिल्याची चर्चा इस्लामपुर शहरात जोरदारपणे सुरु आहे. या प्रकरणानंतर तक्रार दिली तर आपलीच बदनामी होईल या कारणास्तव ‘ झाकली मूठ सव्वालाखाची ’ म्हणून त्या नगरसेवकाच्या समर्थकांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे.

याबाबत रुग्णालय प्रशासनाने दिलेली माहिती अशी : काल शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास येथील एका हॉस्पिटलमध्ये इस्लामपूरमधील एका नगरसेवकाने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. धिंगाणा घालताना काही नातेवाईकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र मदिरेचा अंमल इतका झाला होता की, आपण एक लोकप्रतिनिधी समाजसेवक आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांनी आपली आरेरावी सुरुच ठेवली.

यावर नातेवाईक व रुग्णालय प्रशासनाने त्यांना पकडून ठेवले. पकडल्यानंतर त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना जोरदार मारहाण करण्यात आली. बराच वेळ हा धिंगाणा सुरु होता. काहीवेळानंतर रुग्णालय व्यवस्थापन प्रमुखांना हा प्रकार समजला. त्यांनी कोण आहे याचा अंदाज घेतला व मारहाण करु नका असे सांगितले. मात्र तोपर्यंत अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

रात्री उशिरा या बाबत खळबळ माजली होती. गुन्हा दाखल करणार, यात बेअब्रू होणार या सर्वाची जाणिव झाल्यानंतर संबंधित नगरसेवकाच्या संबंधितांनी तेथून काढता पाय घेत ‘ झाकली मुठ सव्वालाखाची ’ असा पवित्रा घेतला. अंधारात दिलेल्या या चोपाची आज शनिवारी दिवस उजाडल्यावर मात्र शहरात जोरदार चर्चा सुुरु झाली.

या बाबत रुग्णालयाच्या प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेला प्रकार बरोबर आहे असे म्हणून दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘ आपण नगरसेवक आहे याचे भान समाजात वावरताना असले पाहिजे, अन्यथा लोक कोणताही मुलाहिजा न बाळगता चोप देतात हे यावरुन दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com