कऱ्हाडला निविदा वाटून घेण्यावरून नगरसेवकांसह समर्थकांचा धुडगुस

The corporators and supporters of the corporators  clash is karad
The corporators and supporters of the corporators clash is karad

कऱ्हाड : पालिकेच्या कामाच्या निवीदा वाटून घेण्याच्या कारणावरून पालिकेतील सभासद हॉलसह मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या दालनाबाहेरच नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी पालिकेत धुडगुस घातला. यावेळी त्यांनी धक्काबुक्कीसह अर्वाच्य शिवीगाळही केली. वाद झाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्याने खळबळ उडाली. दोन्ही नगरसेवकांच्या सुमारे दोनशे ते तीनशे समर्थक एकमेकांना जोरात अर्वाच्य शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याने धक्काबुक्कीचा प्रकार झाला. सुमारे अर्धातास वादासह धक्काबुक्की सुरू होती.

मुख्याधिकारी डांगे तो वाद घालणाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी केबीन बाहेर धावत आले. पोलिस आल्यानंतर बऱ्यापैकी वातावरण निवळले. सायंकाळनंतर सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात येत होते. 

पालिकेत अनेक निविदा निघतात. त्या घेण्यावरून नेहमीच नगरसेवकात चढाओढ असते. यापूर्वीही असे वाद झाल्याच्या घटना आहेत. मात्र आजच्या घटनेने तो वाद चव्हाट्यावर आला. नेहमीच सभागृहात किंवा पार्टी मिंटीगमध्ये वाद मर्यादेत असतो. आज तो वाद पार्टी मिटींगमध्ये तर झालाच. त्याशिवाय तो पालिकेच्या दालनांच्या आवारात व खाली इमारतीच्या मोकळ्या मैदानात रंगला. सत्ताधारी गटाने आज बैठक घेतली होता. त्या बैठकीत कामगार भरण्याच्या निवीदेचा विषय होता. सत्ताधारी गटाचे नेते त्याबाबत माहिती देत होते. त्याचवेळी ती निविदा पाहिजे, असणारे नगरसेवक व काही नगरसेवकांचे नातेवाईक तेथे जमले होते. एका महिला नगरसेविकेचा दीरही त्यात होता. त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. तो वाद इतका विकोपाला गेला की आघाडीच्या बैठकीत नेत्यांसमोर त्यांनी एकमेकांना शिवीगाळ चालू झाली. त्याचा आवाज पालिकेच्या दालनाबाहेरपर्यंत आल्याने सगळेच अचंबित झाले. दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या समर्थकांना पालिकेत तयारीनिशी येण्याचे कॉल्स केले. त्यामुळे दहाच मिनिटात तेथे तो वाद धक्काबुक्की व अर्वाच्य शिवीगाळ देण्यापर्यंत पोचला.

दोन्ही नगरसेवकांचे समर्थक सभासद हॉल बाहेर जमले होते. त्यातील काही लोक मुख्याधिकारी डांगे यांच्या केबीनबाहेर होते. त्यांच्यात ती निवीदा घेण्यावरून वाद झाला. त्यांनी एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्यावेळी दोन्हीकडील लोक जोरजोरात ओरडू लागले. काय झाले ते कोणालाच कळाले नाही. मात्र केबीनमध्ये बसलेले मुख्याधिकारी डांगे व काही नगरसेवक त्या आवाजाच्या दिशेने धावले. त्यांनी वाद घालणाऱ्यांच्या हाताला धरून त्यांना बाहेर जाण्याचे दरडावले. 

डांगे यांनी प्रसंगावधान राखून पोलिसांना बोलावले. पोलिसांना यायला वेळ लागला. त्यामुळे इमारतीतीतून पालिकेच्या मैदानात गेलेले समर्थक वर सभासद हॉलजवळ असलेल्या समर्थकांना एकमेकांना शिवीगाळ करत होते तसेच अर्वाच्च भाषेत बोलत होते. पोलिस आल्यानंतर मात्र सारेच जण तेथून गायब झाले. त्यानतर वातावरण आटोक्यात आले. दुपारी काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तो वाद मिटवल्याचे सांगण्यात येत होते. 

पालिकेच्या आवारात शिवीगाळ....

नगरसेवक व त्यांच्या समर्थक इतके आक्रमक झाले होते की, कोणत्याच ज्येष्ठ नगरसेवकाचे ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. काहीनी जाऊ दे असे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र का जाऊ दे, बाहरून आलोय का, अशा भाषेत त्यांना उत्तरे मिळत होती. पालिका सुरू असताना वाद झाल्याने पालिकेतील सारेच कर्मचारी व अधिकारी ते पाहण्यासाठी आवारत आले होते. पहिल्यांदाच नगरसेवकात इतक्या मोठ्यांनी शिवीगाळ होण्याचा प्रकार झाला, असे अनेकांनी मत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com