यंत्रमाग उद्योगाला आता सूत दरवाढीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

२५ ते ३० टक्के वाढीमुळे उत्पादन खर्च व विक्रीचा लागेना ताळमेळ

सोलापूर - नोटाबंदीनंतर मंदीत आलेला यंत्रमाग उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत असताना, आता सूत दरवाढीमुळे पुन्हा एकदा संकटात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नव्या दरानुसार उत्पादन व विक्रीचा ताळमेळ बसत नसल्याने येथून पुढे यंत्रमाग उत्पादनांची दरवाढ करावी लागणार आहे. मात्र, दरवाढीमुळे उत्पादनाची विक्री होईल का, असा प्रश्‍न यंत्रमाग उद्योजकांपुढे उभा आहे.

नोटाबंदीनंतर यंत्रमाग उद्योगाला सीझन असतानाही मंदीला सामोरे जावे लागले. डिसेंबरनंतर आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्याने हा उद्योग रुळावर येत होता; मात्र जानेवारीअखेर सुताच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने उत्पादकांसमोर पुन्हा संकट उभे राहिले. सुताच्या नव्या दरानुसार उत्पादन खर्चातही वाढ होत असल्याने उत्पादकांना विक्रीमूल्याचा पडताळा घेता येईना. दरवाढ केल्यास मालाचा उठाव होईल याची शाश्‍वतीही नाही. कारण, येथील ५० ते ६० टक्के उत्पादन युरोप, आखाती राष्ट्र, दक्षिण आफ्रिका, जर्मन या देशांत निर्यात होते. त्यात पाकिस्तान, बांगलादेश व चीनशी स्पर्धा आहे. मालाच्या दर्जाबाबत सोलापूरचे उत्पादन अव्वल असूनही इतर राष्ट्रांतून व राज्यांतून हलक्‍या दर्जाचे उत्पादन स्वस्तात मिळत असल्याने येथे खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. मागील उत्पादनाची जुन्या दराने ७० ते ८० टक्के विक्री झाली असून नवीन उत्पादनाच्या निर्मिती व विक्रीमूल्याचा पडताळा जमत नसल्याने उत्पादक चिंतेत आहेत. मालाला उठाव न झाल्यास पुन्हा मंदी येईल व या उद्योगावर अवलंबून असलेल्या ७० ते ८० हजार कामगारांना पुन्हा बेकारीस सामोरे जावे लागेल.

येथील उद्योजक व्याजाच्या बोजात अडकला आहे. त्यात सूत दरवाढीमुळे नवे संकट समोर आहे. शासनाने उत्पादन निर्यातीला प्रोत्साहन देऊन गृहकर्ज व शेतकऱ्यांसाठी जसा सहा ते सात टक्के व्याजदर आकारला जातो, त्याप्रमाणे यंत्रमागाला मशिनरी व खेळत्या भांडवलीसाठी सहा टक्के दराने कर्जपुरवठा केल्यास उत्पादन खर्च कमी होईल. 
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ

Web Title: cotton rate increase in machineloom business