स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

कऱ्हाड - नगरपालिकेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. 19 डिसेंबरला या निवडी होत आहेत.

आघाड्यांकडील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, तीन स्वीकृत सदस्यांपैकी बहुमतात असलेल्या "जनशक्ती' आघाडीला दोघांची वर्णी लावता येईल.

उर्वरित एका जागेवर अपक्षांच्या मदतीने भाजप दावा सांगणार, की संख्याबळानुसार "लोकशाही' आघाडीला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता आहे.

कऱ्हाड - नगरपालिकेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. 19 डिसेंबरला या निवडी होत आहेत.

आघाड्यांकडील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, तीन स्वीकृत सदस्यांपैकी बहुमतात असलेल्या "जनशक्ती' आघाडीला दोघांची वर्णी लावता येईल.

उर्वरित एका जागेवर अपक्षांच्या मदतीने भाजप दावा सांगणार, की संख्याबळानुसार "लोकशाही' आघाडीला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता आहे.

पालिकेच्या उपाध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांनी 19 डिसेंबरला सकाळी दहा ते 12 या वेळेत मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. स्वीकृत सदस्यांची निवड ही आघाडी, पक्षांच्या संख्याबळानुसार होईल. भाजपकडे नगराध्यक्षपद व चार, "जनशक्ती'कडे 16, "लोकशाही'कडे सहा, तर तीन अपक्ष नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमत असलेल्या "जनशक्ती'ला संख्याबळानुसार दोन स्वीकृत सदस्य घेता येतील. त्यासाठी "जनशक्‍ती'कडून माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. दुसऱ्या जागेसाठी सुरवातीपासून या आघाडीसाठी तडजोडीच्या भूमिकेत अग्रभागी असलेले अतुल शिंदे, प्रभाग दोनमधून पराभूत झालेले जावेद शेख, "जनशक्ती"चे अध्यक्ष अरुण जाधव यांची नावे चर्चेत येण्याची शक्‍यता आहे. उर्वरित एक स्वीकृत सदस्यासाठी भाजप प्रयत्नशील राहू शकते. सहा नगरसेवक असलेल्या "लोकशाही'ला आघाडीनुसार स्वीकृत सदस्य करता येईल. मात्र, भाजपने दोन अथवा तीन अपक्षांच्या सहकार्याने या पदासाठी दावा केल्यास निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून आहे. भाजपकडूनही अतुल भोसले गटाचे महादेव पवार, पावसकर गटाकडून दीपक पाटील व समीर करमरकर, तर चरेगावकर गटाकडून मुकुंद चरेगावकर यांच्या नावाचा विचार होवू शकतो.

त्यापैकी कोणती नावे चर्चेत येणार? संधी मिळाल्यास कोणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता आहे. "लोकशाही'कडूनही ज्येष्ठ नगरसेवक ऍड. मानसिंग पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे व आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे "लोकशाही'ला संधी मिळाल्यास त्यांच्याकडून कोणाला पसंती दिली जाणार? याची उत्सुकता आहे.

उपाध्यक्षपद जनशक्ती आघाडीला मिळणार
बहुमतामुळे उपाध्यक्षपद "जनशक्ती'कडे जाणार आहे. माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक जयवंत पाटील, विजय वाटेगावकर यांची उपाध्यक्षपदासाठी नावे चर्चेत आहेत. यामध्ये ऐनवेळी राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, हणमंत पवार यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. शासनाने सध्या प्रचलित नियमानुसार या निवडी करण्याचे निर्देश दिले असले तरी ऐनवेळी भाजपकडून नगराध्यक्ष नियुक्त उपाध्यक्ष निवड करावयाचे झाल्यास ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Councillors approved desirous