सांगली महापालिका क्षेत्रात पहिल्याच दिवशी 430 हेरिटेज वृक्षांची गणना | Tree Counting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली महापालिका क्षेत्रात पहिल्याच दिवशी 430 हेरिटेज वृक्षांची गणना

सांगली महापालिका क्षेत्रात पहिल्याच दिवशी 430 हेरिटेज वृक्षांची गणना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - माझी वसुंधरा अभियांनाच्या अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील हेरिटेज वृक्षांची गणना सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील २० वॉर्डात हेरिटेज वृक्ष गणना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी पहिल्याच दिवशी ४३० हेरिटेज वृक्षांची गणना करून त्या वृक्षाचे जिओ टॅगिंग करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियानातंर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात ५० वर्षापेक्षा अधिक वयाची असणाऱ्या हेरिटेज वृक्षांची गणना करण्याचे काम सुरू झाले आहे. मनपा क्षेत्रात यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये मनपाक्षेत्रात एकूण ९७० हेरिटेज वृक्ष आहेत. त्यामुळे या सर्व वृक्षांचे माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत जिओ टॅगिंग करून त्यावर विशेष निशाणी लावली जाणार आहे.

हेही वाचा: मधमाशांचे गुंजन! पाहा तुरीच्या पिकात होतेय नैसर्गिक परागीभवन

यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे आणि उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक यांची टीम यावर देखरेख करत आहे. शनिवार पासून महापालिका क्षेत्रात वॉर्ड निहाय हेरिटेज वृक्ष गणना सुरू करण्यात आली असून यामध्ये वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर , अनिल पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक सहभागी झाले आहे. ९७० हेरिटेज वृक्षापैकी शनिवारी पहिल्याच दिवशी ४३० वृक्षांची गणना होऊन त्याचे जिओ टॅगिंग करण्यात आले. जिओ टॅगिंग मुळे आता आपल्या मनपाक्षेत्रात असणारे हेरिटेज वृक्ष हे गुगलमॅपवर प्रसिद्ध होणार आहे. सोमवारपर्यंत उर्वरित वृक्ष गणना पूर्ण होईल असे उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले.

loading image
go to top