हात धुण्यासाठी भाविकांच्या सेवेत चार मोबाईल गाड्या; जिल्हा परिषदेचा उपक्रम

The countrys first mobile hand wash station has been prepared for warkari
The countrys first mobile hand wash station has been prepared for warkari

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने 'पंढरीचे दारी शाश्‍वत स्वच्छतेची वारी' या उपक्रमांतर्गत देशातील पहिले मोबाईल हॅन्ड वॉश स्टेशन तयार केले आहे. भाविकांचे सेवेत चार हॅन्डवॉश स्टेशन (मोबाईल गाड्या) राहतील. 

जिल्हा परिषदेमध्ये हॅन्ड वॉश स्टेशनचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे हस्ते झाले. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, मनुष्यबळ तज्ञ शंकर बंडगर, सनियंत्रण तज्ञ यशवंती धत्तुरे, प्रशांत दबडे, मुकुंद आकुडे उपस्थित होते. डॉ. भारूड यांच्या संकल्पनेतून कमी खर्चात मोबाईल गाड्या बनविल्या आहेत. लहान वाहने 15 दिवसाच्या कालावधीसाठी भाड्याने घेऊन हॅन्डवॉश स्टेशन बनविली आहेत. 

मोबाईल व्हॅनची वैशिष्ट्ये -

  • वाहनावर सहा वॉश बेसीन बसविली आहेत. 
  • हात धुणेसाठी एक हजार लिटरची टाकी आहे. 
  • हात धुतलेले पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून एक हजार लिटर क्षमतेची टाकी टाकाऊ पाणी साठविण्यासाठी. 
  • वाहनावरील स्पिकरच्या माध्यमातून शौचालयाचा वापर प्रचार. 
  • व्हॅनला चित्ररथाप्रमाणे सजविले आहे. 
  • सांडपाण्याचा उपयोग झाडांना पाणी घालण्यासाठी केला जाणार.
  • गोपाळ काल्यापर्यंत ही हॅन्डवॉश स्टेशन कार्यरत. 


 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com