लग्नमंडपातून थेट  विवाह नोंदणी कार्यालयात 

लग्नमंडपातून थेट  विवाह नोंदणी कार्यालयात 

उजळाईवाडी (कोल्हापूर)  ः येथील नंदकुमार शिवाजी पाटील (रा. दादू चौगुले नगर उजळाईवाडी) यांची कन्या तेजस्विनी यांचा प्रतुल मधुसुदन पाठक (बासवाडा राजस्थान) यांच्याशी आज विवाह झाला. उजळाईवाडी येथील मंगल कार्यालयात सोहळा झाला. नवदांपत्याने मंगल कार्यालयातून थेट ग्रामपंचायतीत जाऊन विवाह नोंदणी केली. नवदांपत्याच्या या निर्णयाने वऱ्हाडींनी कौतुक केले.

नवदांपत्य उच्चशिक्षित असून तेजस्विनीचे बी.ई. कॉम्पुटरपर्यंत शिक्षण झाले आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. प्रतुल पाठक बी.ई. इलेक्‍ट्रॉनिक्‍स सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. विवाह नोंदणी कायद्याने बंधनकारक असल्याने मंडपामधून थेट ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नोंदणी केली. दोघांच्या निर्णयाचे सरपंच सुवर्णा माने यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विवाह नोंदणीसाठी वधूवर आल्याचे पाहून ग्रामविकास अधिकारी बी. डी. कापसे, उपसरपंच प्रकाश मेटकरी, तानाजी चव्हाण, दोन साक्षीदार यांनी त्याचे स्वागत करून विवाह नोंदणीसाठी सहकार्य केले. 
सरकारी कामासाठी लगेच विवाह नोंदणी प्रमापत्राची गरज होती. आणि प्रत्येक वेळी विवाह झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात नोंदणी करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणीसाठी हेलपाटे मारावे लागतात. म्हणून नवदांपत्यांनी थेट मंगल कार्यालयातून ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रीतसर नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com