टमटमच्या धडकेने दुचाकीस्वार पती-पत्नीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सोलापूर - दोड्याळ (ता. अक्कलकोट) येथून चिवरी गावाकडे जाताना अणदूर-चिवरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टमटमने धडक दिल्याने दुचाकीवरील पतीचा जागीच तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. 

नागेश आप्पाशा अवताडे व शिल्पा उर्फ सोनी नागेश आवताडे (दोघे रा.दोड्याळ ता.अक्कलकोट) अशी अपघातात मृतांची नावे आहेत. नागेश यांचा अक्कलकोट येथे मोबाईल हॅण्डसेट विक्रीचे दुकान होते. नागेश आणि शिल्पा या यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. शिल्पा या गरोदर होत्या. चिवरी येथील देवीच्या दर्शनासाठी पती-पत्नी मंगळवारी सकाळी दुचाकीवरून चिवरीकडे निघाले होते. दरम्यान, अणदूर-चिवरी फाट्याजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या टमटम चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागेश यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या शिल्पा उर्फ सोनी यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शिल्पा यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: couple death in accident