चोपा प्राथमिक आरोग्य केंद्राने दाखविले आदर्श होण्याचे धाडस! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. राधेशाम पाचे, डॉ. कुमारी नारनवरे, रुग्ण कल्याण समिती, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी रुग्ण सेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायापालट करण्याचे धाडस दाखविले आहे. 

गोरेगाव - 'आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा' हा मुलमंत्र फलकावर लिहीण्याचा अनेक रुग्णसेवा धारी लिहुन दाखविण्याचा प्रयत्न करतात पण कृती करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्या जाते. पण कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी रुग्ण सेवेसाठी लाभला की रुग्ण, पदाधिकारी, कर्मचारी, गावकरी यांच्या मनात, ह्रद्यात जागा करुन उत्साह निर्माण करते, असे गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. राधेशाम पाचे, डॉ. कुमारी नारनवरे, रुग्ण कल्याण समिती, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी रुग्ण सेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायापालट करण्याचे धाडस दाखविले आहे. 
      
ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक उपचार गावपातळीवर व्हावा व अवैध डॉक्टरावर आळा बसावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आले. या केंद्रात अनेक वैद्यकीय अधिकारी येतात. पण त्यांच्या कामावरुन त्यांना पावती मिळते. दोन वर्षापुर्वी चोपा या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राधेशाम पाचे रुजु झाले. त्यांनी सर्वप्रथम शासकीय अनुदानाचा आसरा घेत केंद्र इमारत, सोयी सवलती यांच्यावर भर दिला परंतु यावर अवलंबुन न राहता ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी यांच्यात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ही कल्पना मनामनात उतरविण्याचा प्रयत्न केला. या कामाला यश मिळाल्याने विविध उपक्रम हाती घेतले. सर्वप्रथम केंद्राची इमारत सुशोभित करुन आरोग्य विषयक दर्शनी फलके, टोकण पद्धत सुरु केली. शुद्ध पाण्यासाठी आरओ बसविल्याने रुग्णांची गैरसोय थांबली व स्वच्छता अभियान राबवुन स्वच्छ शस्त्रक्रिया कक्ष, पुरुष आंतर रुग्ण सेवा कक्ष, महीलाचे स्वतंत्र कक्ष, हिरकणी कक्ष तयार केले, भांडार कक्षातील औषधीची मांडणी सरळ सोप्या पद्धतीने करवून घेतली. रुग्णाकरीता वाचन कोपरा, आंतर रुग्ण व बाह्य रुग्ण मनोरंजनासाठी टि. व्ही. संच बसविले, बालकाकरीता दक्षता कक्ष, टाकावु वस्तु कचरा पेटीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत केल्याने स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यास यश मिळाले. सुंदर बाग तयार करुन रुग्ण व कर्मचारी यांना फेरफटका मारुन आनंद घेण्यासाठी मार्ग मोकळा केल्याने चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श म्हणुन पुढे येत आहे. हे कार्य सरपंच, उपसरपंच, सदस्य, रुग्ण कल्याण समिती पदाधिकारी, कर्मचारी, डॉ. राधेशाम पाचे, डॉ. कुमारी नारनवरे यांना श्रेय जात असल्याची चर्चा गावकरी व परिसरातील नागरीकांमध्ये होत आहे.  
 

Web Title: The courage to change the patients vision about chopa primary medical centre