भ्रष्टाचारी, दुराचाऱ्यांना पाठीशी ; "या' महापालिकेची परंपरा

  भ्रष्टाचारी, दुराचाऱ्यांना पाठीशी ; "या' महापालिकेची परंपरा


सोलापूर ः महापालिकेतील सत्तांतरानंतरच्या पहिल्या तीन वर्षांची मुदत संपायला आली आहे. सत्तांतरापूर्वी आणि आताही महापालिकेत अनेक गैरव्यवहार, गैरप्रकार उघडकीस येऊनही पदाधिकारी व प्रशासनप्रमुखांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात तरी "धृतराष्ट्रा'ऐवजी "धर्मराज युधिष्ठर' येईल आणि तो हे प्रकार थांबवेल अशी अपेक्षा अतिसहनशील सोलापूरकरांकडून व्यक्त होत आहे. 

हे आवर्जून वाचाच.... निराधार आजीला मिळाले घर आणि नात...

गैरप्रकाराबाबत "धृतराष्ट्री' भूमिका
महाभारतातील धृतराष्ट्राला आपल्या वारसांकडून कोणती काळीकृत्ये केली जात आहेत याची जाणीव होती. तरीही पुत्रप्रेमापोटी त्याने सर्व अनैतिक कृत्यांकडे दुर्लक्ष करीत हतबल असल्याचे दाखविले. असाच काहीसा प्रकार महापालिकेत दिसून येतो. महिला कर्मचाऱ्याच्या संगणकावर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकण्याचा प्रकार चार वर्षांपूर्वी झाला, काही दिवसांपूर्वी त्यापेक्षा धक्कादायक प्रकार झाला.. काही कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचाऱ्यांना होणारा त्रास...आणखी बरेच काही... या घटना राजरोसपणे होत असताना त्याकडे प्रशासनप्रमुखांचे अजूनही लक्ष गेले नाही हे धक्कादायक आहे. महापौरपदी महिला असूनही महिला अत्याचाराबाबत अत्यंत चीड असणाऱ्या पदाधिकारी व नगरसेविकांनाही या घटनांची अजून कशी "चीड' आली नाही, हेच आश्‍चर्य आहे.

हेही वाचा... फडणवीस आणि तावडेंची वक्तव्य आणि नियतीचा सूड

ऑगस्ट महिन्याची सभा पुन्हा घेतली नाही
गत ऑगस्ट महिन्याच्या विषयपत्रिकेवर भ्रष्टाचारासंदर्भातही काही महत्त्वाचे विषय शिल्लक आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते जबाबदार नगरसेवकांनी दिले होते. हा भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यावर चर्चा सभागृहात झाली असती तर, भ्रष्टाचाराचे किती प्रकार असू शकतात हे साऱ्या शहरवासियांना कळाले असते. जितक्‍या आवेशाने, अभ्यास करून हे विषय सभेकडे पाठवले गेले, तितका आवेश आणि पाठपुरावा विषय देणाऱ्यांकडून झाले नाहीत. त्यामुळे संबंधितांवर "एलईडी'चा "प्रकाश' पडला की "टॉवर'वरून मोबाईल मिळाले अशी चर्चा रंगू लागली आहे. सभा बोलावण्यासाठी महापौरांकडेही पुरेसा वेळ होता. मात्र त्यांच्याकडूनही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. संबंधित विषय सभासद पुन्हा देऊ शकतील असे सांगत सभागृह नेत्यानेही हात झटकले. त्यामुळे "एलईडी'चा

हे आवर्जून वाचा... हाय वे वर चार चाकी घेऊन जाताय...

गरज "धर्मराज युधिष्ठरा'ची
प्रशासकीय घडामोडींबाबतही ज्यांना कठोर निर्णय घ्यायचा आहे ते मात्र "दिखाऊगिरी' करीत आहेत. पाच - दहा हजार रुपयांची थकबाकी असलेल्यांचे नळजोड तोडणारे प्रशासन कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्यांच्या वाटेलाही जात नाही हे धक्कादायक आहे. हे थकबाकीदार कोण आहेत याची माहिती संबंधितांना नाही, अशी स्थिती नाही. मात्र अशा बड्या धेंडावर कारवाईचे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे "नैतिक ताकद'तर असायला हवी, तरच तो कोणाची भीडभाड ठेवणार नाही. एकूणच महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास व्हायचा असेल तर, आजच्या घडीला गरज आहे ती "धृतराष्ट्रा' ची भूमिका वठविणाऱ्याऐवजी "धर्मराज युधिष्ठराची' भूमिका वठविणाऱ्या अधिकाऱ्याची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com