शंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट

सुनील गर्जे 
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे २०१८ मध्ये केलेल्या 'चक्कजाम' आंदोलांनाबद्दल नुकतेच नेवासे न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले. त्यात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलने केली म्हणून गडाखांवर विविध चार कलमे लावण्यात आली आहे.

नेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे २०१८ मध्ये केलेल्या 'चक्कजाम' आंदोलांनाबद्दल नुकतेच नेवासे न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले. त्यात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलने केली म्हणून गडाखांवर विविध चार कलमे लावण्यात आली आहे.

माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यापूर्वी सत्तेत असतांनाही आपल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून रस्तारोको, उपोषणे केले होते. गेल्या चारवर्षांपासून गडाखांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मुळा धरण, नगरसह नेवासे तालुक्यात रस्ता रोको, चक्कजाम, उपोषण, मोर्चे असे केली. मात्र त्यावेळी पोलिस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेत कारवाई करत सोडून दिले. 

दरम्यान वडाळा बहोरोबा येथे शेतकर्यां च्या प्रश्नावरील आंदोलन चिघल्याने गडाखांवर पोलिसांनी कारवाई करत अटक केल्याने ते एक रात्र नेवासे येथे कोठडीत होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या अनेक आंदोलनादरम्यान गडाख यांच्यावर शासनाने पोलिसांकरवी गुन्हे दाखल केलेले आहेत. न्यायालयाने नुकतेच वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणी गडाख यांच्या विरोधात पकड वॉरंट बजावल्याची माहिती असून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

असे आहेत आरोप
शेतकर्यांशच्या प्रश्नांवर आंदोलन केले म्हणून माजी आमदार गडाखांविरोधात रस्ता अडवणे, बेकायदेशीर जमाव जमावाने, जमाव बंदीचे उल्लंघन करणे व सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आदेश न पाळणे या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

शेतकरी होणार गडाखांना जामीनदार  
गेल्या तीन-चारवर्षात नेवासे तालुक्याचे पाटपाण्याचे नियोजन ढसाळल्याने वैयक्तिक माझे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांतना पाटपाणी मिळावे यासाठी आंदोलन केले म्हणून जर माजी आमदार शंकारराव गडाखांना अटक वॉरंट निघाले असेलतर शेतकर्यांमचा प्रतीनिधी म्हणून न्यायालयात मीच त्यांचा जामीनदार होणार असून आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसला तरी यापुढे गडाखांच्या शेतकरी हिताच्या प्रत्येक लढ्यात आपण सहभागी राहणार असल्याचे नेवासे तालुक्यातील चांदे येथील शेतकरी अरुण फुंदे यांनी सांगितले.  

न्यायालयाचा आदर; पण आंदोलने तीव्र करणार : शंकरराव गडाख 
आपण न्यायदेवतेचा कायम आदर करतो. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कायदेशीर कारवाई पूर्ण करणार आहेच. मात्र शेतकरी, सर्वसामान्यांच्या हितासाठी आपला यापुढेही लढा कायमच असून तो आणखी तीव्र करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिली. 

Web Title: Court arrest warrant for Shankarrao Gadak