देवांच्या भेटीलाही न्यायालयाचा अडसर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

भिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न होता. तो केदारेश्वराच्या चरणी झाला. पारंपरिक थापा येथील जागेचा वाद आणि काही लोकांनी देवांच्या भेटीला वेठीस धरल्याने नाराज झालेल्या दांडेघर ग्रामस्थानी निषेध म्हणून ही भेट केदारेश्वरा चरणी घडवली.

दसऱ्याच्या दिवशी दांडेघर (ता.महाबळेश्वर) आणि पसरणी (ता.वाई) येथील ग्रामस्थ सीमोल्लंघन करतात. त्याचबरोबर दोन्ही देवांच्या पालख्या या थाप्यावर पारंपरिक ठिकाणी येऊन देवांची गळाभेट घेतात ही फार पूर्वीची परंपरा आहे. गतवर्षी थापा या जागेचा वाद पेटला आणि या परंपरेला खिंडार पडले. दोन्ही देव जागेच्या वादामुळे भेटलेच नाहीत. कोर्ट-कचेऱ्या, जागेच्या वादाचा भडका यांमुळे पारंपरिक श्रद्धांचाही अंत होतो की काय अशी परिस्थिती झाली. मात्र, ग्रामस्थांनी यावर्षी नेहमीच्या वादग्रस्त जागेचा हट्ट सोडून या वादाचा निषेध म्हणून दोन्ही देवांच्या पालख्यांची भेट हि गावात केदारेश्वराच्या चरणी उत्साहात घेण्यात आली. 

दांडेघर आणि पसरणी या गावाचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच देवांच्या भेटीची थापा ही वादग्रस्त जागा ग्रामस्थांच्या ताब्यात येत नाही. तोपर्यंत ही भेट गावातच होईल. मात्र, पुढल्यावर्षीची भेट पूर्वंपार जागेतच होईल, अशी आशा दोन्ही गावच्या पालख्यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थानी व्यक्त केली. 

यावर्षीच्या विजयादशमी आणि दोन्ही देवांच्या भेटीचे आकर्षण म्हणजे संभाजी महाराज मालिकेतील राणू आक्का ही कलाकार आणि पसरणी गावची कन्या अभिनेत्री अश्विनी प्रदीप महांगडे यांनी या सीमोल्लंघन आणि पारंपरिक भेटीच्या सोहळ्यात सहभाग घेतला. पालखीचे स्वागत करताना पांचगणीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या हस्ते अश्विनी महांगडे यांचा सत्कार कारण्यात आला. 

Web Title: Court barriers to meet Temple Darshan