मुलाची बलात्काराची 'चूक' पोटात घालणार्‍या आईस तीन वर्षांची कैद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सातारा : पिराचीवाडी (ता. वाई) येथे अल्पवयीन मुलीवर दोन वेळा बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक  पी. व्ही. घुले यांनी सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

प्रशांत एकनाथ घोरपडे (वय 31) असे शिक्षा मिळालेल्याचे नाव आहे. त्याची आई शोभा हिलाही न्यायालयाने तीन वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. मुलाची चूक पोटात घालण्यासाठी तिने पीडित मुलीचा गर्भपात केला होता. पीडितेला 5 लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

19 आणि 25 जून 2011 या दिवशी प्रशांत घोरपडेने जबरदस्तीने बलात्कार केला होता. पाच महिन्यानंतर  मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलासह तिच्या कुटुंबाकडे जाब विचारल्यानंतर प्रशांतनेही कबुली दिली.

मुलीशी लग्न करतो आता तो गर्भपात करा असे लेखीटाकी केले. गर्भवती मुलीचा गर्भपात केल्यानंतर मात्र मुलाने नंतर विवाहासाठी नकार दिला. अखेर त्यानंतर 23 डिसेंबर 2011 रोजी वाई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील मंजुषा तळवलकर यांनी युक्तिवाद केला.

Web Title: Court hands over punishment for shielding rapist