एसटी-दुचाकी अपघातात चुलत भावांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सातारा : येथील जरंडेश्‍वर नाका येथे काल (ता. 22) रात्री उशीरा झालेल्या
दुचाकी व एसटी बसच्या अपघातात वडूथ (ता. सातारा) येथील चुलत भावांचा
मृत्यू झाला. हणमंत अनंत शिंदे (वय 38), नागेश गुलाब शिंदे (वय 50, दोघे रा. वडूथ ता.सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

काल रात्री ते भाटमरळी येथील नातेवाईकांडे जेवण करायला गेले होते. रात्री
साडेबाराच्या ते जेवण करून वडूथला परतत होते. शहरातील जरंडेश्‍वर नाका
परिसरात ते पोचले. या वेळी वाढे फाट्याहून मुख्य बस स्थानकाकडे जाणाऱ्या
विजापूर-सातारा या एसटी बसशी त्यांची धडक झाली. जोरदार धडकेमध्ये दोघे
गंभिर जखमी झाले. दुचाकी एसटीच्या खाली गेल्याने दुचाकीचाही चक्काचूर
झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत शाहुपूरी पोलिस
ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: cousins dies in two wheeler and st accident