कोविड डिटेक्‍शन सेंटर इस्लामपूरात सुरू होणार : पी. आर. पाटील... राजारामबापू कारखाना, कृष्णा हॉस्पिटलचा उपक्रम 

धर्मवीर पाटील 
Wednesday, 26 August 2020

इस्लामपूर (सांगली)- जिल्ह्यातील तसेच वाळवा तालुक्‍यातील कोरोनाचे वाढते संकट पाहून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आणि 
कृष्णा हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड डिटेक्‍शन सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली. 

श्री. पाटील म्हणाले,""लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्ण व नातेवाईकांना दिलासादायक ठरेल, असे कोविड डिटेक्‍शन सेंटर उभारत आहोत. ताप, अंगदुखी, धाप लागणे आणि थकवा या तक्रारी सोबतच सर्दी, घसादुखी, चव व वास न येणे यासारख्या तक्रारी असूनही हाती तपासणी अहवाल नसल्याने गरजू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होणे अवघड होते. काहींचा तपासणी अहवाल मृत्यू पश्‍चात येतात. हेचक्र आणि रुग्ण व नातेवाईकांचे होणारे हाल थांबवण्यासाठी सदरचे कोविड सेंटर सुरु होत आहे. या सेंटरमध्ये रॅपिड ऍटेंजिन टेस्ट मोफत व आर. टी. पी. सी. आर. ही टेस्ट 2400 रुपयांत होणार आहे. त्याचा अहवाल एका दिवसात मिळणार आहे. तो विश्वासार्हही असेल.'' 

संपर्काचे आवाहन 
शुक्रवारी (ता. 280 पासून सकाळी 8 ते 11 यावेळेत राजारामबापू ज्ञानप्रबोधनी कार्यालय (इस्लामपूर) येथे हे सेंटर कार्यरत असेल. रुग्णांनी आधारकार्ड, मोबाईल व पूर्वतपासणी केलेल्या संबंधित डॉक्‍टरांचे संदर्भपत्र सोबत आणावे. माहितीसाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Detection Center to be set up in Islampur: P. R. Patil