दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकतची लागण

राजकुमार शहा 
मंगळवार, 22 मे 2018

मोहोळ - पापरी परिसरातील दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली असुन त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तर अनेक जनावरे मृत्युच्या दारात उभी आहेत. तातडीने लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्याची मागणी दुधउत्पादकामधुन होत आहे. 

पापरी परिसर हा संपुर्ण बागायती असल्याने शेतीला जोडधंदा म्हणुन मोठया प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. प्रत्येक शेतकऱ्याकडे चार ते पाच दुभत्या जर्सी गायी तसेच म्हशी आहेत. एका दुभत्या जनावराची ऐशी हजार ते एक लाखापर्यंत किमत आहे.

 गेल्या आठवड्यापासून जनावरांच्या जीभेला मोठमोठे फोड आले आहेत. तर चालताना चांगले जनावर लंगडणे, तोडातुन लाळ गाळणे अशी लक्षणे दिसु लागली आहेत. तोंडाला फोड आल्याने जनावरांना चारा खाता येत नाही. त्याचा परिणाम दुध उत्पादनावर मोठ्या प्रमाणात  झाला असुन, दुध उत्पादन घटले. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांनाही त्याची झपाटयाने लागण होत आहे.

खाजगी डॉक्टराकडुन उपचार करून घेतला तर त्यांना अवाच्यासवा बिल दयावे लागते. गरीब शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या पशुवैधकीय विभागाकडुन लाळ्या खुरकत प्रतिबंधकलसीकरण शिबीराचे आयोजन करावे अशी मागणी पशुपालकामधुन होत आहे. ज्या जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशी जनावरे मृत्युच्या दारात उभी आहेत.

Web Title: cows infected with lobsters