तरुणाईत ‘टॅटू’ गोंदविण्याची वाढली क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tattoo

तरुणाईत ‘टॅटू’ गोंदवून घेण्याची क्रेझ हल्ली वाढली आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव, आकर्षक डिझाईन किंवा ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ‘टॅटू’ अंगावर गोंदवून घेण्याचे प्रमाण वाढत आहे.

तरुणाईत ‘टॅटू’ गोंदविण्याची वाढली क्रेझ

बेळगाव - तरुणाईत (Youth) ‘टॅटू’ (Tattoo) गोंदवून घेण्याची क्रेझ (Zraze) हल्ली वाढली आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव, आकर्षक डिझाईन किंवा ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ‘टॅटू’ अंगावर गोंदवून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. खासकरून युवावर्गामध्ये याची खूप ट्रेंड आहे. एकेकाळी कला, पार्टटाईम व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जायचे. परंतु, मागणीमध्ये वाढ आणि पैसेही बऱ्यापैकी मिळत असल्याने व्यावसायिक ‘टॅटू’कार तयार होऊ लागले आहेत. शहरी भागात फुल्ल टाईम व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे.

बाजारपेठेत वेगवेगळ्या स्वरुपाचे ट्रेंड असतात. स्टाईलिश लूक, फॅशनेबल कपडे, गॉगल्स आणि आकर्षक वॉच आदींसोबत ‘टॅटू’ची मागणीही तितकीच वाढते आहे. तरुणाईंमध्ये याची खूप क्रेझ तयार झाली आहे. यामुळे ‘टॅटू’ची नवीन दुनिया तयार झाली आहे. तरुण व तरुणाईतील वाढती मागणी लक्षात घेता या व्यवसायाचे स्वरुप बदलले आहे. सध्या चलती असलेले आणि फॅशनेबल ‘टॅटू’ गोंदविण्यात येत आहेत.

हेही वाचा: फिरूनी नवी जन्मली ‘सृष्टी’; सकारात्मकतेने कर्करोगावर मात

त्यामुळे मोठा वर्ग या फॅशनकडे आकर्षित होऊ लागला आहे. शाळेत किंवा काही महाविद्यालयात टॅटू काढून घेतलेल्यांना प्रवेश मिळत नाही. काही संदर्भात त्याला आक्षेप घेतला जातो. या कारणांनी कॉलेजनंतर किंवा नोकरीला नवीन रुजू, खासगी व्यवसाय, गृहिणी यात अधिक रस दाखविताना दिसतात. ‘टॅटू’ला निश्‍चित दर नाही. डिझाईन आणि आकारनुसार त्याचे दर ठरतात. हातावर ‘टॅटू’ गोंदवून घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अभिनेता, अभिनेत्रीकडून गोंदवून घेण्यात आलेले ‘टॅटू’ची कॉपी करतानाही दिसते.

खबरदारी खूप जरुरी

‘टॅटू’ गोंदवून घेताना खूप काळजी घेणे जरुरी आहे. ‘टॅटू’ काढणारी व्यक्ती पारंगत असावी हे पाहावे. तसेच ‘टॅटू’मुळे जखम होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच ‘टॅटू’ काढत असलेल्या ठिकाणी स्वच्छता राखली जाते का? हे पाहावे.

‘टॅटू’ गोंदवण्याची क्रेझ वाढत आहे. याबद्दल दुमत नाही. पण, ‘टॅटू’ गोंदवून घेण्यापूर्वी विचार केला जावा. एकदा ‘टॅटू’ गोंदवून घेतल्यानंतर ते आपल्यासोबत रोज असणार आहे. ‘टॅटू’ गोंदवून घेणे सोपे आहे. पण ते घालविणे अवघड असते.

- सुदर्शन दोड्डमनी, आर्ट हाऊस, शुक्रवार पेठ, टिळकवाडी

Web Title: Craze For Tattoo Has Grown In Youth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Youthbelgaumtattoo
go to top