Video : दिवाळीत 'या' वस्तूची राहणार क्रेझ!

प्रशांत देशपांडे
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

सरकारने चिनी वस्तू आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणल्याने दिवाळीसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदिलाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

सोलापूर : पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा सध्या ट्रेंड वाढला आहे. गणेशोत्सवात शेणापासून आणि शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणपतीची यंदा मोठी मागणी होती. आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. मातीपासून बनविलेले आकाशकंदील पहिल्यांदाच बाजार पेठांमध्ये दाखल झाले आहेत. ते वापरण्याची सध्या क्रेझ वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. 

सरकारने चिनी वस्तू आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणल्याने दिवाळीसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदिलाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामध्ये कागद आणि कापडापासून तयार करण्यात आलेल्या आठ प्रकाराच्या आकाशकंदिलांना जास्त मागणी आहे. यंदा प्रथमच सोलापूरच्या बाजारात मातीचे आकाशकंदील ही नवीन संकल्पना बाजारात आली आहे. ही संकल्पना महिला वर्गांना जास्त आवडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

- तळीरामांसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून खुशखबर.. पाहा काय आहे खुशखबर!

हे आकाशकंदील विविध प्रकारच्या मातीपासून तयार केलेले आहेत. त्या आकाशकंदिलावर आकर्षक असे रंगकाम करण्यात आल्याने त्यामध्ये नारळ, झुंबर, झोपडी यांच्यासह विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत आहेत.

यंदा बाजारात स्वत: विक्रेत्यांनीच चायनीज आकाशकंदील न विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर यंदा सरकारने प्लॉस्टिक बंदी केल्याने बाजारात पर्यावरणपूरक आकाशकंदिलाची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहेत. त्याचबरोबर यंदा बाजारात आकाशकंदिलाचे 100 ते 150 प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये चांदणी, गोल आकाशकंदीलांना जास्त मागणी आहे. 

- एचआयव्हीप्रमाणेच पसरतो हा विषाणू, बिग बींना झाली बाधा

यंदा मातीचे आकाशकंदील प्रथमच बाजारात आले आहेत. याची रचना करून त्यावर आकर्षक रंगकाम केल्याने ते खूप सुंदर दिसत आहे. प्लॉस्टिकच्या आकाशकंदिलांपेक्षा हे आकाशकंदील अधिक उठावदार दिसत आहे.
- स्वाती कुलकर्णी, ग्राहक

अशा प्रकारचे हटके कंदील प्रथमच बाजारात आले आहेत. प्लॉस्टिकच्या आकाशकंदीलांपेक्षा रंगसंगती वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ते आकर्षक दिसत आहेत.
- वैशाली काटोळे, ग्राहक

चायनीजचे आकाशकंदील आता बाजारातून हद्दपार झाले आहेत. पर्यावरणपूरक आकाशकंदीलामध्ये साधारण 8 प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबोबर आकाशकंदिलाचे 100 ते 150 प्रकार आहेत.
- यतिन शहा, विक्रेता

- Vidhan Sabha 2019 : पंकजा मुंडेंना प्रचारादरम्यान चक्कर (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Craze of light lamp is going to be in full swing this Diwali