'नितीन कोळी अमर रहे'ने वारणाकाठ दुमदुमला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सांगली - जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले दूधगावचे (ता. मिरज) सुपुत्र नितीन सुभाष कोळी (वय 28) यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'नितीन कोळी अमर रहे'च्या घोषणांनी वारणाकाठ दुमदुमला.

गावात शोकसभा होऊन वारणा नदीच्या काठावर शासकीय इतमामात नितीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन यांचा मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. या वेळी गावातून नदीकाठापर्यंत मानवी साखळीचे आयोजन गावकऱ्यांनी केले होते. दूधगावात लोटला जनसागर होता. नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत सुमारे चार किमीपर्यंत रांगा होत्या. नितीन कोळी यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नितीन कोळी अमर रहे, भारत माता की जय च्या घोषणांनी दुधगावचा वारणा काठ दुमदुमला. 

अंत्यसंस्कार मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. पुरुषांबरोबर महिलाही अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. अंत्यसंस्कारावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी आमदार सुधीर गाडगीळ, सहकार मंत्री सुभाष देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदींची उपस्थिती होती.

Web Title: cremated on martyr nitin koli in sangli dudhgaon