कृष्णेच्या पात्रात चक्क क्रिकेटचे मैदान

कृष्णेच्या पात्रात चक्क क्रिकेटचे मैदान

सांगली - नेहमी तुडूंब भरून वाहणारी कृष्णा नदी मार्चमध्येच कोरडी पडल्याने पाणी टंचाई भासणार याची चिंता सांगलीकरांना सतावू लागली आहे. तर कोरड्या नदी पात्राचा उपयोग मुलांनी क्रिकेटचे मैदान म्हणून केला आहे.

एकेकाळी भरभरून वाहणारी कृष्णा नदी यंदा मात्र कोरडी पडली आहे. धरणातून पाणी सोडले नसल्याने सांगलीत पाण्याची पातळी घटली आहे. पात्र कोरडे पडल्याने याचा उपयोग आता खेळाचे मैदान म्हणून केला जात आहे. या कृष्णेच्या पात्रामध्ये शाळकरी मुले क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आहेत. 

शिरोळ तालुक्यातील सुमारे 35 गावांमध्ये पाणी बाणी जयसिंगपूर - उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कृष्णा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. केवळ दूषित पाणी प्रवाहित झाल्याचे चित्र आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथून जयसिंगपूर शहरासाठी पाण्याचा उपसा होतो. मात्र, काही दिवसात पाणी उपशावर मर्यादा येणार आल्याने शहरासह शिरोळ तालुक्यातील सुमारे 35 गावांमध्ये पाणी बाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. 

सोमवारपर्यत नदी पात्रात पाणी न आल्यास शहरासह विविध गावाच्या पाणी योजना बंद पडण्याची भीती आहे. उन्हाळयाच्या पार्श्वभुमीवर पाटबंधारे विभागाने नेटके नियोजन करुन वारणा चांदोली धरण व कृष्णा कोयना धरणातुन पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

शिरोळ तालुका हा समृध्द तालुका म्हणुन ओळख आहे. वारणा, कृष्णा, पंचगंगा व दुधगंगा या चार नदयाच्यामुळे तालुक्यात बारमाही पाण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या मुबलकेतेमुळे भाजीपाल्यासह अन्य पिके घेताता. मात्र नदीपात्रात पाण्याची कमरता भासल्याने इरीगेशन योजना बंद पडल्याने पाणीपुरवठा ठप्प होते. त्यामुळे शेतक-यांचे नियोजन कोलमडत असून शेतकरी अर्थिक संकटात सापडत आहे.

कृष्णानदीवरील सांगली येथील बंधा-यांपुढील तालुक्यातील उमळवाड, उदगांव, जयसिंगपूर, संभाजीपूर, चिपरी, चिंचवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, हासूर, शिरटी, कवठेगुंलद, गणेशवाडी, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, बस्तवाड, बुबनाळ, आलास, अकिवाट, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, सैनिक टाकळी तर सांगली जिल्हयातील सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, म्हैसाळ योजना तर कर्नाटक सीमाभागातील कागवाड, उगार खुर्द, ऐनापूर, शिरगुप्पी, मांजरी, कल्लोळ, चंदुर टेक, यडूर यासह अनेक गावाना सध्या पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होत असून, उन्हाळा सुरु झाल्याची आठवण या कृष्णेच्या पात्रात पाणी नसल्याने करुन दिली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने तात्काळ कृष्णेच्या पाण्यासाठी नियोजन करुन पाणी सोडण्याची गरज आहे. अन्यथा अनेक गावात पाणी बाणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com