श्रीरामपूर एक्‍सप्रेस झहीर खानला पद्मश्री 

Cricketer Zaheer Khan declare to Padma Shri
Cricketer Zaheer Khan declare to Padma Shri

 नगर : भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात दबदबा निर्माण केलेल्या श्रीरामपूर एक्‍स्प्रेस अर्थात झहीर खानला पद्मश्री जाहीर झाला आहे. झहीरलाही हा सन्मान मिळाल्याची माहिती उशिरा समजली. ही माहिती येताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एका खेडे गावातून क्रिकेटला सुरूवात करणाऱ्या मुलाच्या या प्रवासाने सर्वांनाच आनंदाचे भरते आले.

 जिल्ह्यात तीनजणांना उच्च सन्मान
समाजसेवेत काम करणाऱ्या हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार, आदिवासी भागात देशीबीज संवर्धनाचे कार्य करणाऱ्या बीजमाता अशी ओळख असलेल्या राहिबाई पोपेरे यांनाही पद्मश्रीने सन्मानित केले आहे. एकंदर जिल्ह्यात तीनजणांना या उच्च सन्मान मिळाल्याने सर्वत्र हीच चर्चा होती. 

स्टीव्ह वॉ याचा त्रिफळा उडवला

झहीर खान मूळ श्रीरामपूर शहरातील आहे. क्रिकेटला त्याने त्याच शहरातून सुरूवात केली. नगरच्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडकातही त्याने अनेकदा सहभाग घेतला होता. प्रारंभी तो बडोद्याकडून खेळला. रणजी क्रिकेट करंडकात त्याने छाप पाडल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. या डावखुऱ्या गोलंदाजाने अल्पावधीतच छाप पाडली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना त्याने अप्रतिम यॉर्करवर महान फलंदाज स्टीव्ह वॉ याचा त्रिफळा उडवला, तेव्हापासून तो प्रकाश झोतात आला. भारतीय क्रिकेट संघाचा तो मुख्य गोलंदाज झाला. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले. यॉर्कर हे त्याच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र होते. 

झेडकेज नावाने हॉटेल

झहीर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झेडकेज नावाने हॉटेल सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. झहीरच्या श्रीरामपुरातील आठवणी या पद्मश्रीमुळे जाग्या झाल्या. भारतीय संघात त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा क्रिकेट संघटनेने त्याचा मोठा सन्मान सोहळा केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com