पंढरपूर येथील माजी नगरसेवकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पंढरपूर - शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर मटका सुरू असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सोमवारी (ता. २२) दुपारी पोलिसांनी येथील एसटी बसस्थानकाशेजारील अनिलनगर येथील मटका अड्ड्यावर छापा टाकून ४४ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन माजी नगरसेवकांसह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी पेट्रोलिंग करण्यात आले. या वेळी बसस्थानकासमोरील अनिलनगर व नवीपेठ या ठिकाणी चालत असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला. या वेळी संशयित आरोपी दिलीप रतनलाल परदेशी, दिनेश अनंतलाल परदेशी, सुरेश शिवाजी शिंदे, राजू लक्ष्मण मेटकरी, शिवाजी गोवर्धन बेसुळके, दत्तात्रय बाजीराव माने, शुभम दशरथ सुरवसे, एकनाथ राजाराम वाघमारे, सागर नंदू लऊळकर, किशोर चंद्रकांत हत्तीगोटे (सर्व रा. पंढरपूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ४४ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

संशयित आरोपींकडे मटक्‍याच्या मालकाबाबत अधिक चौकशी केली असता, माजी नगरसेवक प्रताप नारायण गंगेकर व शिवाजी अप्पा कोळी यांची नावे समोर आली. या सर्वांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस नाईक अमृत खांडेकर, मिलिंद कांबळे, अंकुश मोरे, पोलिस हवालदार अभिजित ठाणेकर, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, प्रवीण पाटील, स्वप्नील गायकवाड, महादेव लोंढे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Crime against former corporators of Pandharpur