विना परवाना डॉल्बी लावल्याबद्दल हिंदू एकता आंदोलन संघटनेविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कऱ्हाड - अक्षय तृतीयेला साजाऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त येथे बुधवारी काढलेल्या शाही दरबार मिरवणुकीत विना परवाना डॉल्बी लावल्याबद्दल हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पाचजणांवर ध्वनी प्रदुषणाचा गुन्हा दाखल झाला. हिंदू एकता आंदोलनचे प्रताप विनायक घोरपडे यांच्यासह डॉल्बी चालक शुभम संजय जाधव (रा. मंगळवार पेठ), मालक शंकर कदम (रा. मंगळवार पेठ) व ऑपरेटर विजय यांच्यासह ट्रक्टर चालकांचा त्यात समावेश आहे.

हवालदार दीपक घाटगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरासह परिसरात हिंदू एकता आंदोलनतर्फे काल (बुधवार) रोजी शहरात दरबार मिरवणुक काढण्यात आली. त्यासाठी प्रताप घोरपडे यांनी स्पीकर परवाना घेतला होता. त्यांना परवाना दिला होता. मात्र तो देताना डॉल्बी न लावण्याची अट पोलिसांनी घातली होती. डॉल्बी लावण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र तरीही दरबार मिरवणुकीत डॉल्बी लावण्यात आला होता. तो मिरकवणुक संपेपर्यंत होता. 

मिरवणुकीत डॉल्बी मंगळवार पेठ, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौक मार्गावर मिरवणुकीत वाजवण्यात आला. तो वाजवू नये याबाबत वारंवार सुचना देऊनही डॉल्बीचा वापर करण्यात आला. त्यामुळे हवालदार घाटगे यांनी सरकारर्फे फिर्याद दिली आहे.

Web Title: The crime against the Hindu Ekta Andolan Sanghatana for unauthorized possession of Dolby