८५ लाखांची फसवणूक प्रकरणी तीन नायजेरियन युवकांवर गुन्हा

८५ लाखांची फसवणूक प्रकरणी तीन नायजेरियन युवकांवर गुन्हा

विटा - पैसे ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरित करून त्यानंतर भारतीय रुपयामध्ये एक्‍सचेंज करून तो पैसा कन्स्ट्रक्‍शनमध्ये गुंतवणूक करणार आहे असे सांगून विट्यातील एका तरुणाची व त्याच्या मित्रांची सुमारे ८४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या फसवणूकप्रकरणी मार्क विल्यम ऊर्फ इसाई कीपेनेतीज मुताई (रा. नामीबिया देश), डॉ. मलीक साहीब (रा. दिल्ली) व जॉन ओबीना चुकवुडी (रा. नायजेरीया देश) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सचिन बाळकृष्ण लोटके (भवानीनगर, नेवरी रोड, विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही फसवणूक डिसेंबर २०१७ ते ५ मे २०१८ या कालावधीत केली आहे. 

सचिन लोटके विटा येथील जयभवानी कन्स्ट्रक्‍शनमध्ये काम करीत असताना मार्क विल्यम ऊर्फ इसाई  कीपेनेतीज मुताई, डॉ. मलीक साहीब व जॉन ओबीना चुकवुडी या तिघांनी संगनमत करून लोटके यांचा विश्‍वास संपादन केला. परकीय चलनातून भारतीय चलनाप्रमाणे तिप्पट- चौपट पटीत रक्कम मिळवून देण्याच्या आमिष दाखवून गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे असलेली २७ कोटींची ॲन्टी ब्रीज मनी म्हणजे ब्लॅंक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरित करून त्यानंतर भारतीय रुपयामध्ये एक्‍सचेंज करून तो पैसा गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार या सर्व प्रक्रियेसाठी २७ कोटींची ब्लॅक करन्सी युरो या चलनात रूपांतरित करण्यासाठी ब्लॅक करन्सीवर लावण्यासाठी लागणारे लिक्विड, ओरिजनल ५०० युरोचे चलन असणाऱ्या १२० नोटा व त्यासाठी ब्लॅक करन्सी ग्लोबल सिक्‍युरिटी ऑफिस बंगळूर येथून रिलीज करण्यासाठी व सर्व प्रक्रिया केल्यानंतर काळे कागदाचे बंडल ठेवण्यासाठी लागणारे लॉकर्ससाठी वेळोवेळी ८४ लाख ८० हजार रुपये सचिन लोटके व त्यांच्या मित्रांकडून त्या तिघांनी रोख घेतले होते. त्यानंतर ब्लॅक करन्सी विदेशी युरोमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया करीत असताना त्या तिघांनी दिलेले काळे कागद, लिक्वीड, ५०० युरो चलनाच्या १२० नोटा व इतर साहित्य  बनावट असल्याचे समजले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com