द्राक्ष व्यापाऱ्यांकडून ५८ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

तासगाव - मणेराजुरी (ता. तासगाव) येथील नऊ द्राक्ष बागायतदारांकडून ५८ लाख ५१ हजार रुपयांची द्राक्षे खरेदी करून घेऊन पैसे न दिल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत बंगळूर येथील दोन व्यापाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला.

तासगाव - मणेराजुरी (ता. तासगाव) येथील नऊ द्राक्ष बागायतदारांकडून ५८ लाख ५१ हजार रुपयांची द्राक्षे खरेदी करून घेऊन पैसे न दिल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत बंगळूर येथील दोन व्यापाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला.

मणेराजुरी येथील बाळासो भीमराव शिंदे (वय ३०) यांच्याकडून १० फेब्रुवारीला गावातील अधिक नामदेव पवार (एजंट) व सागर वनखडे (एजंट, रा. कवठेमहांकाळ) यांच्या मध्यस्थीने व्यापारी एस. जयराम व दुसरा व्यापारी उमेश (दोघेही रा विजयपुरा. ता. देवनहळ्ळी. जि बंगळूर) यांनी ४ किलोला १४८ रुपये मालाचा दर ठरवून २९२२ पेटी, असा एकूण रक्कम ४ लाख ३२ हजार ५३० रुपये  व सोनाका द्राक्षे १ पेटीचे १३० रुपये या दराने एकूण २००२ पेटीचे एकूण १ लाख ३० हजार ६५० रुपये असे एकूण द्राक्षपेटी ३९२४ रक्कम रुपये ५ लाख ६३ हजार १८८ रुपयांची द्राक्षे काढून नेली. त्यापैकी ५० हजार दिले आहेत. त्यांच्या कडून येणे रक्कम रुपये ५ लाख १३ हजार १८० असे झाले आहे.

याशिवाय बाळासो निवृत्ती जमदाडे यांचे द्राक्षमालाची एकूण रक्कम ३ लाख ८० हजार, उत्तम रामचंद्र भोसले द्राक्षमालाची एकूण रक्कम ४, लाख ५० हजार, तानाजी तुकाराम शिंदे द्राक्षमालाची एकूण रक्कम १ लाख ५३ हजार, विश्वास भगवान सूर्यवंशी द्राक्षमालाची एकूण रक्कम २ लाख २ हजार, उतम यशवंत कलहोणे यांच्या द्राक्षमालाची एकूण रक्कम १० लाख ९८ हजार, संजय पंडित पाटील यांच्या द्राक्षमालाची एकूण रक्कम १८ लाख रुपये, नामदेव तोडकर यांच्या द्राक्षमालाची एकूण रक्कम ९ लाख ५० हजार, भीमराव बाजीराव नलवडे यांच्या द्राक्षमालाची, २ लाख ५७ हजार, बजरंग शहाजी नलवडे यांच्या द्राक्षमालाचे ५० हजार, अशी एकूण ५८ लाख ५१ हजार अशी फसवणूक झाली आहे. नामदेव पवार (एजंट, रा. मणेराजुरी), सागर वनखडे (एजंट, रा. कवठेमहांकाळ) व्यापारी एस. जयराम, उमेश यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime against two businessmen in Bangalore