राजकीय द्वेषातूनच उदयनराजेंवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

सातारा - राजकीय खच्चीकरण करण्यासाठीच खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या प्रकारात गोवण्यात येत असून, हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज उदयनराजे समर्थकांनी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास व पोलिस दलास निवेदन दिले. दरम्यान, राज्यातील कार्यकर्त्यांचा संयम तुटत चालला असून, राज्यभर आंदोलने होण्याची शक्‍यता समर्थकांनी निवेदनात वर्तवली आहेत. 

उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लोणंदस्थित सोना ऍलाईज कंपनीतील कामगारांना न्याय मिळावा यासाठी खासदार उदयनराजे प्रयत्न करीत होते. त्याबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू असताना उदयनराजेंच्या विरोधकांनी कंपनीच्या मालकाशी संधान साधून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. उदयनराजेंनी नेहमीच राजकीय, सामाजिक कारकिर्दीत जनतेची बाजू मांडली. त्यामुळे जिल्ह्यातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. खोट्या गुन्ह्यात उदयनराजेंना अटक झाल्यास त्यांचे समर्थक पेटून उठतील; परिणामी जिल्ह्यासह राज्यभर आंदोलने केली जातील, अशी शक्‍यता निवेदनात वर्तवली आहे. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सदस्य संदीप शिंदे, बाळासाहेब गोसावी, बाळासाहेब चोरगे यांच्यासह समर्थकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

रामराजेंच्या राजीनाम्याची मागणी 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याची चौकशी करावी तसेच नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या सभापतींनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Crime against Udayan Raj in political hatred