esakal | बापरे ! घोडागाडी शर्यतीचा असाही थरार; पण गुन्हा दाखल (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे ! घोडागाडी शर्यतीचा असाही थरार; पण गुन्हा दाखल (व्हिडिओ)

गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घोडागाडी शर्यतीचे आयोजन करणारे आणि स्पर्धक अशा 15 जणांवर येथील पोलिसांत पाळीव प्राणी प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.  सोमवारी (ता. 2) दुपारी तीनच्या सुमारास या शर्यती झाल्या.

बापरे ! घोडागाडी शर्यतीचा असाही थरार; पण गुन्हा दाखल (व्हिडिओ)

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घोडागाडी शर्यतीचे आयोजन करणारे आणि स्पर्धक अशा 15 जणांवर येथील पोलिसांत पाळीव प्राणी प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.  सोमवारी (ता. 2) दुपारी तीनच्या सुमारास या शर्यती झाल्या.

शर्यत आयोजक राजेंद्र बाबू कुरळे, सदाशिव शंकर चोथे, आण्णाराव दुंडाप्पा चौगुले, बसाप्पा पट्टणकुडी, रवींद्र बाळासाहेब शेंडुरे, बाबुराव कलाप्पा कोरी, राजेंद्र शिवाप्पा बंदी, बसवराज स्वामी, राजेंद्र जोतिबा कुरळे, आप्पासाहेब मारूती कोडोली (सर्व रा. भडगाव), प्रकाश भीमराव चव्हाण (रा. चन्नेकुप्पी, ता. गडहिंग्लज) यांच्यासह स्पर्धक महांतेश महादेव कोळी, रोहित महादेव भोई, दिपक मारूती कांबळे (सर्व रा. भडगाव) व भैय्या सुरेश चव्हाण (रा. नूल, ता. गडहिंग्लज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी सांगितले की, भडगावातील रोहन राजेंद्र कुरळे (वय 5) याच्या वाढदिवसानिमित्त चोथेवाडी ते चिंचेवाडी रोडवर घोडागाडी शर्यतींचे आयोजन केले होते. उच्च न्यायालयाने बैल व घोडागाडी शर्यतीस बंदी घातल्याचे माहीत असूनही शर्यतीचे आयोजन करून लोकांच्या जिवास धोका निर्माण केला, तसेच स्पर्धकांनी घोड्यांना निर्दयपणे वागणूक देवून मारहाणीद्वारे त्यांचा छळ केल्याची तक्रार पोलिस पाटील उदय पुजारी यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार 15 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

शर्यतीचा थरार...
चोथेवाडी ते चिंचेवाडी दरम्यानच्या डांबरी रस्त्यावर या शर्यती सोडण्यात आल्या. 18 घोडागाडी स्पर्धक सहभागी होते. चिंचेवाडीहून चोथेवाडीकडे शर्यतील गाड्या येताना ए. डी. शिंदे कॉलेजच्या वळणावर भरधाव वेगातील एक घोडागाडी उलटली. गाडी, घोड्यांसह चालक दोन वेळा पलटी खाऊनसुद्धा पुन्हा घोड्यांना उभे करून जीवावर उदार होत 'त्या' चालकाने शर्यतीत सहभाग घेतला. तसेच घोडागाडींच्या मागे - पुढे असणाऱ्या वाहनांचा वेगही धडकी भरवणारा होता. यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हीडीओद्वारे शर्यतीचा थरार अंगावर रोमांच आणणारा आहे.

loading image
go to top