म्हणून झाला त्याच्यावर चाकूने हल्ला...

crime case in belgaum
crime case in belgaum

बेळगाव  : मित्रासमवेत बोलत थांबलेल्या तरुणाबरोबर वाद घालत त्याच्या पाठीत चाकू खुपसण्यात आल्याची घटना बुधवार (ता.20) सायंकाळी पावने सहाच्या सुमारास शिवाजीनगर पहिला क्रॉस येथे घडली. अनिकेत अनिल मधुमत (रा. चव्हाट गल्ली) असे जखमीचे नाव असून या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात चौघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस दप्तरी जरी अशी नोंद असली तर हे प्रकरणी गांजा सेवण प्रकरणातून घडल्याची चर्चा सुरु आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी, शिवाजी घाटगे, संभाजी शिवाजी घाटगे, अजय नागो खन्नूकर, विष्णू विठ्ठल चव्हाण (सर्वजण रा.शिवाजीनगर पहिला क्रॉस) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. जखमी अनिकेत हा काल सायंकाळी शिवाजीनगर पहिला क्रॉस येथील बालसुधारगृहानजिक मित्रासोबत बोलत थांबला होता. मित्रा मित्रामध्ये चेष्टा मस्करी करत असताना तेथून जात असलेल्या शिवाजी यांनी मला पाहून कशाला शिवीगाळ करत आहात अशी विचारणा केले. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. त्यांनतर वरील अन्य तिघा संशयित देखील त्याठिकाणी आले आणि चौघांनी मिळून अनिकेतला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्या पाटीत चाकू खुपसण्यात आला.

हाणामारीनंतर परिसरात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला काहींनी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन माहिती घेतली. त्यानंतर चौघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. अद्याप कोणाला अटक झाली नाही .गेल्या काही दिवसापासून या भागात गांजा सेवण करणाऱ्यांचा वावर वाढला आहे. नशेत धांगडधुंगाना घालणे, रस्त्यावरुन ये जा करणाऱ्यांना विनाकारण शिवीगाळ करणे, रात्री उशीरापर्यंत असे प्रकार चालत आहेत. पोलिसांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवासी वैतागले आहेत. गांजावरुन हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com