जुगार अड्डे शहरातून शिवाराकडे ; चक्रीच्या नावावर श्रीमंत होताहेत अड्डाचालक

crime case in belgaum for wages of some people village to city in balgam
crime case in belgaum for wages of some people village to city in balgam

जुने बेळगाव : जुगाराचे अड्डे आता शहराकडून शिवाराकडे वळू लागले आहेत. जुने बेळगाव स्मशानभूमी परिसरात जुगार अड्डा सुरु झाला असून त्यापाठोपाठ कुंतीनगर परिसरातील शेतवाडीतही जुगार सुरु आहे. आठवड्यातून दोन दिवस मांसाहरी जेवणासह जुगार खेळण्यास व्याजी तत्त्वावर पैसेही दिले जात आहेत.

जुने बेळगाव आणि कुंतीनगर परिसर मागील काही वर्षांपासून गैरधंद्यांसाठीच अधिक चर्चेत येऊ लागले आहेत. जुने बेळगाव, शहापूर, वडगाव, खासबाग परिसरात यंत्रमाग कामगारांची संख्या अधिक आहे. मजुरीसह दोन पैसे अधिक मिळावेत म्हणून हे कामगार जुगारी अड्ड्यावर येऊन आपले नशीब आजमावतात. मात्र चक्रीच्या नावावर याठिकाणी श्रीमंत केवळ अड्डाचालक होत आहेत.

खेळण्यास येणाऱ्यांची याठिकाणी चांगली बडदास्त ठेवली जाते. जुने बेळगाव परिसरातीलच एका घरात खेळण्यासाठी येणाऱ्यांचे जेवण तयार केले जाते. खेळण्याच्या ठिकाणी वेळेत हे जेवण पोचविले जाते. तर रविवार आणि इतर एक दिवशी याठिकाणी मांसाहारी जेवणही ठेवले जाते. त्यामुळे अनेकांना हा अड्डा घरचा अड्डाच ठरला आहे. मांसाहारी जेवणाच्या दिवशी खेळणाऱ्यांचीही मोठी गर्दी होते. चक्रीच्या व्यवहारातून दिवसाकाठी लाखोची माया जमा केली जात आहे. मात्र आजवर पोलिसांच्या नजरेत हे अड्डे 
आलेले नाहीत.

नियमीत खेळण्यास येणाऱ्यांनाच याठिकाणी परवानगी दिली जाते. इतर नवख्या माणसाला नियमित खेळणाऱ्याच्या ओळखीवर प्रवेश दिला जातो. खेळताना एखादा पैसा हरल्यास त्यास पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करीत याठिकाणी पैसेही दिले जात आहेत. मासिक १० टक्के व्याजदराने सावकारी कर्ज दिले जात आहे. त्यामुळे सध्या अनेक मजूर सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत.

हे कर्ज फेडण्यासाठी आणखी जुगाराच्या नादी लागत आहेत. अनेक कुटुंबे यामुळे रस्त्यावर येऊ लागली आहेत. कुंतीनगर आणि जुने बेळगाव स्मशानभूमीच्या मागे असलेल्या दोन्ही अड्ड्यांसह परिसरातील शिवारातही अनेक ठिकाणी लहान-मोठे जुगार बसत असून जुगार घेणारे यामुळे बक्कळ माया जमवू लागले आहेत. 

पोलिसांची गस्त हवी

जुने बेळगाव परिसरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यावर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी येथे गस्त वाढविणे आवश्‍यक आहे. थर्टीफर्स्टला या ठिकाणी शिवारात युवकांकडून घातला जाणारा गोंधळ थांबविण्यासाठी पोलिस लक्ष ठेवणार असल्याचे सुतोवाच स्वतः पोलिस आयुक्तांनी केले होते. प्रत्यक्षात मात्र शिवाराकडे पोलिस फिरकलेच नाहीत. केवळ गल्लोगल्ली फिरुन लोकांमध्ये भिती निर्माण करण्यात आली. पोलिसांची या ठिकाणी गस्त वाढल्यास येथील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवले जाऊ शकते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com