अनोळखीच्या आत्महत्येने उडाला थरकाप; पेटवून घेऊन संपविले जीवन

गांधीनगरला घडलेली घटना; आत्महत्येचं कारण गुढच
अनोळखीच्या आत्महत्येने उडाला थरकाप; पेटवून घेऊन संपविले जीवन

बेळगाव : गांधीनगर, भुयारीमार्ग येथे अनोळखीने स्वतःला पेटवून घेऊन जीवन संपवल्याची (crimenews) धक्कादायक घटना आज (१९) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचा मृत्यू अशी नोंद पोलिसांनी (belgaum police) केली आहे. तसेच आत्महत्येच्या पाठीमागील कारण समजले नाही. दरम्यान, मृत व्यक्तीचे वय सुमारे ४५ ते ४८ या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हॉटेल संकमजवळ गांधीनगरला (gandhinagar) जाण्यासाठी भुयारीमार्ग आहे. तेथे सुमारे ४५ ते ४८ वयोगटातील व्यक्ती हातात पेट्रोल कॅन घेऊन आज (१९) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आली. येथील रस्त्यावरून ये-जा आणि वाहनांची थोडी फार वर्दळ होती. या दरम्यान त्यांने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतः पेटवून घेतले. घटनेने खळबळ उडाली. थरकाप उडविणाऱ्या घटनेने नागरिकांची गर्दी झाली आणि काहीनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नही केला. परंतु, आगीचा भडका मोठा होता. यामुळे आग आटोक्यात आली नाही. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

अनोळखीच्या आत्महत्येने उडाला थरकाप; पेटवून घेऊन संपविले जीवन
निपाणी तालुका उद्यापासून पूर्ण लॉक; प्रशासनाचा निर्णय

महांतेनगरमधून आणले पेट्रोल

पेटवून घेणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या करण्याची तयारीच केली होती, असे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. व्यक्तीने दुपारी महांतेशननगरमधील पेट्रोल पंपामधून पेट्रोल खरेदी केले. तेथून तो भुयारी मार्गखाली जाऊन स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती आहे. तेथे काही नागरिक होते. पण, त्यांना काही कळण्यापूर्वी आगीचा भडका उडाला, अशी माहिती माळमारुती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com