दैव बलवत्तर; ओढ्यातून वाहून जाताना 3 महिला बचावल्या

तब्बल दोन तास महिलांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते
दैव बलवत्तर; ओढ्यातून वाहून जाताना 3 महिला बचावल्या

जत : जत तालुक्यात गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने पाच्छापूर ओढ्याला आलेल्या पाण्यातून तीन महिला रस्ता ओलांडताना वाहून जाण्याची घटना घडली. या घटनेनंतर लगेचच काही तरूणांच्या मदतीने तिघांना ही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तब्बल दोन तास महिलांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. गुलशन साहेबलाल शेख (वय 45), कल्पना आप्पासाहेब सरगर (वय 45) व मंगल राजकुमार बाबर (वय 46, रा. पाच्छापूर, ता. जत) असे पाण्यात बुडालेल्या महिलांची नावे आहेत.

ग्रामस्थांनी दिलेली अधिक माहिती अशी, की गुरूवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाच्छापूर, अमृतवाडी, मुचंडी, खोजानवाडी, उमराणी, बिळूर भागात ओढे खळखळून वाहत होते. यावेळी पाच्छापूर गावातील ओढा पावसाच्या पाण्याने भरून वाहत होता. सकाळी शेत मजूरीला गेलेल्या सात महिला सायंकाळी घरी पाच्छापूर येथे परतत असताना तीन महिलांनी पाण्यातून वाट काढत पलिकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला.

दैव बलवत्तर; ओढ्यातून वाहून जाताना 3 महिला बचावल्या
आता कोरोनामुक्त गावांना मिळणार तब्बल 50 लाख

दरम्यान, पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघी महिला पाण्यासोबत वाहत गेल्या. गुलशन शेख या महिलेला पोहता येत असल्याने ती एक किलोमीटर ओढ्यात पोहत गेली व एका झाडाच्या फांदीला धरून थांबली. यावेळी अनिल भोसले, आर्यन सुतार, अमोल बाबर, साहेबलाल शेख, सचिन सरगर, तानाजी कोळी या तरूणांनी त्या महिलेला रस्सी टाकून बाहेर काढले. मंगल बाबर व कल्पना सरगर या महिला पाण्यात वाहत जात असताना इतर चार महिलांनी आरडा ओरडा केला. तेवढ्यात जत येथे कृषी सहाय्यक श्रीकांत नाटेकर, मोसीन मुजावर, आनंदा जाधव, युनूस मुल्ला, आसिफ सुतार, सरदार सनदी, वृशभ पोतदार, मनोज देवकर, या तरूणांनी दोन्ही महिलांना सुरक्षित बाहेर काढले. तब्बल दोन तास बचाव कार्याची मोहीम सुरू होती. यावेळी तरूणांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com