बेळगावात महिला पोलिसाची आत्महत्या ; कारण मात्र गूढच

crime cases in belgaum police constable women dead in belgaum
crime cases in belgaum police constable women dead in belgaum

बेळगाव : इंडस्ट्रियल सिक्‍युरिटी फोर्समधील महिला पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांबरा येथे गुरुवारी (ता. २५) ही घटना उघडकीस आली. सुजाता हणमंतगौडा करेण्णावर (वय ३५, रा. हंपीहोळी, ता. रामदुर्ग) असे त्यांचे नाव आहे.

सुजाता या इंडस्ट्रियल सिक्‍युरिटी फोर्समध्ये कार्यरत होत्या. त्या गेल्या काही वर्षापासून सांबरा विमानतळावर सेवा बजावत होत्या. त्यामुळे त्या या आपल्या पती व मुलासह सांबरा येथे एका भाड्याच्या घरात राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्यांनी अचानक आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती. त्यामुळे आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com