esakal | 40 हजाराची लाच घेणारा सरंपच लाचलुचपतच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

40 हजाराची लाच घेणारा सरंपच लाचलुचपतच्या जाळ्यात

40 हजाराची लाच घेणारा सरंपच लाचलुचपतच्या जाळ्यात

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : करगणी येथील रस्ता कॉंक्रीट कामाचे बिल मंजुर करून पैसे जमा करण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना करगणीचे (ता. आटपडी) सरपंच गणेश खंदारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. (bribery)

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी ग्रामपंचायत करगणी येथून नवबौध्द समाज गल्ली शेटफळे रस्ता कॉक्रीट करण्याचे काम घेतलेले आहे. सदर कामाचे बिल मंजूर करून जमा केल्याच्या मोबदल्यात ग्रामपंचायत करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील सरपंच गणेश खंदारे यांनी बिलाच्या ४ टक्के रक्कम लाच म्हणून मागितली असल्याबाबत तक्रारदार आली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल (१५) रोजी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सापळा लावला. यावेळी सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय ३९) यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजार रूपये लाचेची मागणी केली. ही रक्कम स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

हेही वाचा: दैव बलवत्तर! आंबोली दरीत उडी घेतलेली विवाहिता बचावली

या घटनेविरुध्द आटपाडी पोलिस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे  व शसुहास नाडगौडा सो अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सुजय घाटगे, उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली गुरूदत्त मोरे पोलिस निरीक्षक, प्रशांत चौगुले पोलिस निरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी, संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

loading image