नगरसेवक अभिजित चव्हाणसह चौघा जणांवर गुन्हा दाखल

नगरसेवक अभिजित चव्हाणसह चौघा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर - दांडिया खेळण्याच्या कारणावरून फुलेवाडीत झालेल्या मारामारीप्रकरणी नगरसेवक अभिजित चव्हाणसह चौघांवर आज गुन्हा दाखल झाला. फुलेवाडी रिंगरोड बालावधूतनगर येथे रविवारी (ता. १४) रात्री मारामारी झाली होती.

याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद शशिकांत राजाराम दळवी (वय ४५, रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी) यांनी दिली. नगरसेवक अभिजित चव्हाण, रणजित कारंडे, राकेश चव्हाण, बाबा कोरडे (सर्व रा. बालावधूतनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडिया खेळण्याच्या कारणावरून रविवारी (ता. १४) रात्री दहाच्या सुमारास बालावधूतनगर येथे दोन गटांत मारामारी झाली. या मारामारीप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. 

काल शशिकांत दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत मुलगा आदित्यबरोबर झालेला वाद मिटविण्यासाठी राकेश व गणेश चव्हाण यांनी त्यांना बालावधूतनगर येथे रविवारी बोलवून घेतले. यावेळी वाद झाला. यातूनच सर्व संशयितांनी त्यांना व त्यांची पत्नी रूपाली यांना काठीने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार चारही संशयितांवर गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com