महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

बार्शी -  रुग्णालयातून घरी जात असताना महिलेस बुलेटवरून येऊन अश्‍लील भाषा वापरली, शिवीगाळ करून लज्जा वाटेल अशा असभ्य शब्दांनी मानहानी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नागजी दुधाळ असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव असून रविवारी दुपारी साडेअकराच्या दरम्यान बेदराई विहीर रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. जगदाळे मामा रुग्णालयात महिलेचा मुलगा उपचारार्थ असून घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी जात असताना दुधाळ यांनी ‘तुमची लायकी आहे का, मी नगरसेवक आहे’, असे म्हणून अपशब्द वापरले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास पोलिस नाईक गुरुनाथ शेजाळ करीत आहेत .

दरम्यान, शनिवारी पोलिसांत रात्री साडेआठच्या दरम्यान भगवंत मैदानावर महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून सुशांत पवार, मुकेश पवार, बबलू पवार, सनी कापुरे (रा.सोलापूर रस्ता) या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on corporator in barshi