सीपीआरमधील अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

चार हातगाड्या हटवल्या - मोठ्या पोलिस फौजफाट्यात कारवाई
कोल्हापूर - सीपीआरमधील अतिक्रमणे हटविण्यास आज सुरवात झाली. न्यायालयात धाव न घेतलेल्या चार हातगाड्या आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने हटवल्या. 

चार हातगाड्या हटवल्या - मोठ्या पोलिस फौजफाट्यात कारवाई
कोल्हापूर - सीपीआरमधील अतिक्रमणे हटविण्यास आज सुरवात झाली. न्यायालयात धाव न घेतलेल्या चार हातगाड्या आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने हटवल्या. 

सीपीआर प्रशासनासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २७ मार्चला बैठक घेतली होती. डॉक्‍टरांच्या संपाबाबत झालेल्या या बैठकीत सीपीआरमधील अतिक्रमणाचा विषय पुढे आला होता. सीपीआरमध्ये १४ अतिक्रमणे असून, ती हटविण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले होते. 
अन्यथा तुमच्यावरच कारवाई करू, असेही सुचित केले होते. त्यानुसार प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याबाबत पावले उचलली. १४ पैकी काही जणांनी न्यायालयात दाद मागितली. त्याची सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे. 

अतिक्रमण केलेल्यांपैकी चार जण न्यायालयात गेले नव्हते. त्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सी. पी. बुरले हे सहकार्यांसमवेत सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी येथे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक दादा पवार हे फौजफाटा घेऊन सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मारुती मंदिराशेजारील हातगाडीपासून अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली. 
 

यांच्यावर झाली कारवाई
सुनील आनंदा पाटील, कोल्हापूर टी स्टॉल (प्रवीण कीर्तीकर), कोल्हापूर जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, महाराजा नाष्टा सेंटर (विमल कांबळे) यांची अतिक्रमणे हटविण्यात आली. दीड तास ही कारवाई सुरू होती; मात्र कारवाईस विरोध होईल, अशी शक्‍यता होती; मात्र तसा कोणताच प्रकार घडला नाही.

Web Title: crime on cpr encroachment