दीडशे जणांवर तडीपारीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनीही जोरदार तयारी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचलन, मॉक ड्रील, दंगा काबूचा सराव आदींची तयारी केली आहे.

कऱ्हाड शहरासह तालुक्‍यातील सुमारे १५० जणांची दोन दिवसांपुरती तडीपारीची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे संबंधितांवर तडीपार होण्याची टांगती तलवारच आहे. 

मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (गुरुवारी) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. तो बंद शांततेच्या मार्गाने व्हावा, यासाठी मराठा आंदोलन समन्वय समितीने आवाहन केले आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबवण्याची कार्यवाही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातून संचलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रील, दंगा झाला तर तो कसा काबूत आणायचे याचेही प्रात्यक्षिक केले आहे. त्यामधून त्यांनी पोलिस ‘अलर्ट’ आहेत असाच संदेश दिला आहे. आंदोलनादरम्यान काही समाजकंटकाकडून दंगा होण्याची शक्‍यता गृहीत धरून पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरासह तालुक्‍यात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी १५० जणांना तात्पुरते हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश आहे. त्यामुळे संबंधितावर हद्दपारीची टांगती तलवारच असणार आहे.

महाराष्ट्र बंद’चे कोणत्याही प्रकारचे पडसाद कऱ्हाडमध्ये उमटू नयेत, यासाठी पोलिसांनी आवश्‍यक ती दक्षता घेतली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटकांवरही आमची नजर आहे. कऱ्हाड शहरासह तालुक्‍यातील शांततेसाठी दोन दिवसांसाठी काहींना हद्दपारीचीही कार्यवाही सुरू आहे.
- नवनाथ ढवळे, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड

Web Title: Crime Criminal Tadipaar