Poster
Poster

‘दि एंड’ इन कस्टडी!

सातारा - केवळ गुणवत्ता असून उपयोगी नसते. त्याचा योग्य ठिकाणी वापर आवश्‍यक असतो. याचीच प्रचिती बनावट नोटांच्या छपाईमध्ये अडकलेल्या युवकांवरून येते. छपाईच्या ठिकाणाच्या भिंतीवर त्यांनी लावलेल्या पोस्टर्सवरून त्यांच्यातील कल्पक बुद्धीची प्रचिती येते. मात्र, कमी वेळात जादा पैसे कमविण्याच्या लोभाने पोस्टर्सच्या या साखळीचा एंड अखेर कस्टडीत झाला आहे. 

बनावट नोटांची साताऱ्यात छपाई..? असा कपाळावर आटया आणणारा प्रश्‍न आज साताऱ्यातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल या प्रकाराचा पर्दाफाश करत सहा जणांना अटक केली.

त्यामुळे युवा पिढी कोणत्या मार्गाला चालली आहे, हे स्पष्ट होत आहे. कमी वेळेत जादा पैसे कमविण्याच्या आमिषाने शिकलेले युवक गुन्हेगारीला बळी पडल्याचे या प्रकरणातून समोर येत आहे. नोटा छापण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे युवक उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यात कल्पकताही होती. हे नोटा छापल्या जात होत्या त्या फ्लॅटवर त्यांनी लिहिलेल्या सूचना व केलेल्या पोस्टरबाजीवरून समोर आले आहे. 

शुक्रवार पेठेतील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या किचनमध्ये छपाई होत होती. या रूमचे त्यांनी आर्टरूम असे नामकरण केले होते. या आर्टरूमच्या प्रवेशावरील भिंतीवर त्यांनी ‘कृपया आत येण्याचे कष्ट घेऊ नये, आपल्यासाठी बाहेर योग्य व्यवस्था आहे,’ असे लिहिले होते. त्यावर विशेष सूचना असे म्हणून ‘अगदी महत्त्वाचे काम असल्यास आम्हीच बाहेर येऊ’ आणि कंसात ‘तुम्ही आत येऊ नये’ असे लिहिलेले आहे. त्यावरून त्यांच्या कल्पक बुद्धीची प्रचिती येते. विचार करायला लावणारा असाच हा सूचना फलक होता. त्यांच्या आर्टमध्ये गेल्यावर आणखी थक्क करणारी पोस्टर्स पाहायला मिळतात.

बनावट नोटा छपाईच्या कामाच्या सुरवातीपासून पैसे मिळेपर्यंतचा प्रवास, प्रत्येक टप्प्यावरील त्यांना झालेला त्रास व भावना त्यांनी एकूण आठ पोस्टर्समध्ये मांडलेल्या आहेत. हे युवक शिकलेले तर आहेतच. त्यांनी स्वप्नेही मोठी पाहिली. मात्र, ती साध्य करण्यासाठी मार्ग चुकीचा निवडला. आजवर अनेकांनी अनेकदा हे स्पष्ट केले आहे. यशासाठी शॉर्टकट टाळा. त्या यशाचे समाधान चिरकाल टिकणारे नसते, हा उपदेश या प्रकरणात तंतोतंत लागू पडला आहे. या पोस्टर्समधील प्रवास त्या युवकांनी एखाद्या चांगल्या उद्देशाने केला असता तर, त्यांना यश नक्कीच मिळाले असते, हे त्यांच्या विचारातून दिसते. मात्र, मार्ग चुकला आणि पोस्टर कथेचा एंड कस्टडीत झाला. याचा विचार प्रत्येक युवकाने नक्कीच करायला पाहिजे.

सातारा - बनावट नोटा बनविण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्यातील प्रत्येक टप्पा आणि त्या वेळची त्यांची मानसिकता या संशयितांनी अत्यंत चपलखपणे किचनच्या भिंतीवर पोस्टर्सच्या माध्यमातून मांडली होती. नोटा छापण्यास प्रारंभ झाल्यापासून ते अगदी त्यांना त्यापासून मिळू लागलेल्या पैशांपर्यंतच्या त्यांच्या भावना या पोस्टर्समधून तिथे रेखाटल्या होत्या. अर्थात, या पोस्टरकथेचा शेवट कस्टडीत होईल, याची त्यांना तेव्हा कल्पनाही नसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com