पर्यटनस्थळांवर पोलिसांना धक्काबुक्की केल्याने अकरा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : कोयना धरणाच्या स्वागत कक्षावर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना व ओझर्डे धबधब्याजवळ वन्यजीव विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना पर्यटकांनी धक्काबुक्की केली. त्यानुसार अकरा पर्यटकांवर गुन्हा दाखल झाला.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या स्वागत कक्षावर बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना व ओझर्डे धबधब्याजवळ वन्यजीव विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना पर्यटकांनी धक्काबुक्की केली. त्यानुसार अकरा पर्यटकांवर गुन्हा दाखल झाला.

कोयना धरणाच्या स्वागत पोलीस कक्ष समोरील पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्या प्रकरणी सागर काळभोर, सूरज काळभोर, हर्षवर्धन भोसले, शुभम काळभोर, सुभाष शेलार, विशाल शेलार, सचिन काटे, समीर काळभोर यांच्यावर गुन्हा नोंद आहे. संबधित पर्यटक कऱ्हाड तालुक्यातील पाल, करवडी, शहापूर भागातील आहेत. कोयना धरणाच्या प्रवेशद्वारा जवळ असणाऱ्या स्वागत पोलीस कक्षातील पोलीस कर्मचार्यास यांनी धक्काबुक्की केली होती. प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना जाण्याचा प्रयत्न केला म्हणून सुरक्षेसाठी तैनात पोलीसांनी त्यांना अडवल्याने धक्काबुक्की केली.

ओझर्डे धबधब्याजवळ वन्यजीव कर्मचारी मारहाण प्रकरणी चार पर्यटकांवर गुन्हा नोंद झाला आहे. वन्यजीव कर्मचारी मारहाण प्रकरणी समीर साबळे, विक्रम साबळे, सूरज साबळे व प्रमोद साबळे (सर्व रा. वडुथ) यांच्यावर गुन्हा नोंद आहे.

Web Title: crime filed against 11 tourist for beating police