महिलेचे साडेतीन तोळ्यांचे गंठण पळविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कोल्हापूर - राजारामपुरी मेन रोडवर काल रात्री महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दोघा मोटारसायकल चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. याबाबतची फिर्याद प्रतिमा प्रशांत गांधी (वय ५१, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - प्रतिमा गांधी माळी कॉलनीत राहतात. पुतण्याचे लग्न असल्याने त्याच्या खरेदीसाठी काल सायंकाळी मुलगी व मैत्रिणीसोबत राजारामपुरीत  गेल्या होत्या. आठव्या गल्लीतील कापड दुकानात त्यांनी खरेदी केली. त्यानंतर सुमारे पावणेनऊच्या सुमारास त्या दुकानाबाहेर बोलत उभ्या होत्या.

दरम्यान, दुकानाजवळ एका काळ्या मोटारसायकलवर दोन तरुण थांबले होते. त्या बोलत असताना मोटारसायकलस्वार काही क्षणांत त्यांच्याजवळ आले. त्यांतील मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठन हिसडा मारून लंपास केले. त्यानंतर दोघे चोरटे ११ वी गल्लीच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर त्याचा गांधी व त्यांच्या मैत्रिणीने पाठलाग केला; मात्र ते मिळून आले नाहीत. याबाबत गांधी यांनी आज राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात ५२ हजार ५०० रुपये चोरीची नोंद झाली.

चोरटे तरुण
चोरटे अंदाजे २५ ते ३० वयोगटातील असून अंगाने मध्यम होते. त्या दोघांनी काळे कपडे परिधान केले होते. मोटारसायकल चालविणाऱ्या चोरट्याला दाढी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: crime in Kolhapur