'लोकमंगल'च्या संचालकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख याच्यासह लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी (बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) या संस्थेच्या नऊ संचालकांवर बुधवारी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दुग्धशाळा विस्तारीकरण व दूधभुकटी प्रकल्प उभारणीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रभारी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग दादू येडके (रा. आकाश दर्शन सोसायटी, कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमंगल सोसायटी या संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजिनाथ लातूरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशहा शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राल नरसगोंडे अशी आरोपींची नावे आहेत.

Web Title: Crime on Lokmangal Director