बेधडक ! कोल्हापुरात पितापुत्रांवर सावकारीप्रकरणी गुन्हा

Crime On Money Lender Surve Jadhav Family In Kolhapur
Crime On Money Lender Surve Jadhav Family In Kolhapur

कोल्हापूर - खासगी सावकारीप्रकरणी सहकार विभागाच्या फिर्यादीवरून राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चेचीराम उर्फ किशोर सुर्वे, त्याचा मुलगा रूपेश (दोघेही रा. टेंबे रोड), तुळशीदास नारायण जाधव, त्याचा मुलगा अभिजित (दोघेही रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहकार विभागाच्या या आक्रमक कारवाईने खासगी सावकार व त्यांच्याशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.  

यातील सुर्वे पितापुत्रांविरोधात २० मे २०१९ रोजी एकाने तक्रार 
दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी त्याच्या टेंबे रोडवरील घरावर छापा टाकला. त्यात कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर, लिहलेले स्टॅम्पपेपर, पासबूक, खरेदी पावती असे साहित्य मिळून आले. गेल्या तीन-चार दिवसांपासून सहकार उपनिबंधक अमर शिंदे यांनी या दोघांकडे चौकशी सुरू केली होती; पण चौकशीत या दोघांकडून सापडलेल्या आक्षेपार्ह कागदपत्रांबाबत योग्य तो खुलासा न झाल्याने आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सहनिबंधक प्रेमदास रोहिदास राठोड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

जाधवविरोधातही सहकार विभागाकडे तक्रार

राजारामपुरी पोलिस ठाण्यात सहायक निबंधक आनंदराव महादेव चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवर तुळशीदास जाधव व त्यांचा मुलगा अभिजीतवर गुन्हा दाखल झाला आहे. जाधवविरोधातही सहकार विभागाकडे तक्रार आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ डिसेंबर रोजी त्यांच्या राजारामपुरी येथील घर, कळंबा, अंबप येथील फॉर्म हाऊस व पाच बंगला परिसरातील टायर दुकानात छापा टाकला. या छाप्यात बेकायदेशीर सावकारीशी संबंधित काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली होती. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांवरही महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ व ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सुर्वेविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास कॉन्स्टेबल वडर तर जाधववर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com