crime news 22 kg cannabis drug seized from farm house in Vaddi miraj
crime news 22 kg cannabis drug seized from farm house in Vaddi miraj sakal

वड्डीतील फार्म हाउसवरून २२.८५ किलो गांजा जप्त

एकास अटक ; पुणे सीमा शुल्कची धडक कारवाई

मिरज : मिरज पूर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून तब्बल २२.८५ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती पुणे सीमा शुल्क विभागाने ट्विटरवरून प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, काल झालल्या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. थेट सीमा शुल्क विभागानेच मिरजेत कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहे.

अधिक माहिती अशी, की मिरजेतील एका उद्योजकाच्या फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने सांगलीच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने दोन दिवसापुर्वी छापा टाकला. त्याठिकणहुन तब्बल २२.८५ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची लाखो रूपये किंमत आहे. दरम्यान, ‘नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक’ पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. मिरजेत पुण्याचा सीमा शुल्क विभागाने थेट कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com